धोनीच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियाविरुध्दचा कालचा सामना भारताकडे झुकला!

काल भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात मालिकेतील दुसरा वनडे सामना नागपुरात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवल्या. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ धावानी विजय मिळवला. भारताने या विजयासह पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियापुढे २५१ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून विराट कोहलीने ११६ धावांची महत्वपूर्ण शतकी खेळी खेळली. कोहलीने कारकिर्दीतील ४० वे शतक झळकावले. विराट कोहलीला विजय शंकरने चांगली साथ दिली. त्याने ४६ धावांची खेळी केली.

धोनीच्या निर्णयाने बदलले सामन्याचे चित्र-

भारतानं दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाकडे ऑस्ट्रेलियाची वाटचाल सुरू होती. त्यांचं पारडं जरा जडच वाटत होतं. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा होता. अॅरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा, पीटर हॅण्ड्सकोम्ब आणि मार्कस स्टॉईनिस यांनी झुंजार खेळी केली. त्यांच्या फलंदाजीच्या जीवावर ऑस्ट्रेलिया विजयच्या जवळ पोहचला होता.

पण धोनीचा सल्ला भारताला विजयाकडे घेऊन गेला. विजय शंकरला ४६वी ओव्हर टाकायला द्यायची, असा विचार विराट कोहलीनं केला होता. म्हणजे, जसप्रित बुमराहला शेवटची ओव्हर देता येईल, असं त्याचं मत होतं. परंतु, ४६ वी ओव्हर बुमराहलाच देण्याची सूचना धोनी आणि रोहितनं केली. शंकरनं त्याच्या आधीच्या षटकात १३ धावा दिल्या होत्या. त्याला ४६ वी ओव्हर दिली आणि त्यातही जास्त धावा निघाल्या, तर भारतावरचा दबाव वाढेल, हे त्यामागचं गणित होतं.

धोनीचा हा सल्ला कोहलीने ऐकलं आणि बुमराहला ओव्हर देण्यात आली. याच ओव्हरमध्ये सामन्याचे चित्र फिरले. बुमराहने या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर नॅथन कुल्टर नाइलला (४ धावा) बाद केलं आणि चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला (०) तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे कांगारूंची अवस्था ८ बाद २२३ अशी झाली.

विजय शंकरनं शेवटच्या ओव्हरमध्ये जी चलाखी दाखवली, ती भारीच होती. पण, ४६ वी ओव्हर त्याला न देण्याचा निर्णयही तितकाच निर्णायक ठरला. शेवटच्या षटकात कांगारूंना ११ धावांची गरज असताना, शंकरनं तीन चेंडूत दोन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा ‘खेळ खल्लास’ केला आणि भारतानं मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *