देशातील सर्वात महागडे वकील, राम जेठमलानी यांची संपत्ती बघून अवाक व्हाल..

क्वचित असे एखादे हायप्रोफाईल प्रकरण असेल, जे या व्यक्तीने कोर्टात लढले नसेल. या व्यक्तीला देशातील सर्वात महागडा वकील समजले जाते. मात्र, हे वकील आता कोर्टात दिसणार नाहीत. होय, हे वकील म्हणजे राम जेठमलानी.

शाग्र बुद्धीमत्तेचे राम जेठमलानी यांनी 10 वी अर्थात तत्कालिन मॅट्रिकची परीक्षा 13 व्या वर्षी उत्तीर्ण केली होती. वकीलीचे शिक्षण अर्थात LLB त्यांनी 17 व्या वर्षी पूर्ण केले. तेव्हा वकिली व्यवसाय करण्यासाठी 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता पाहून तेव्हा एक विशेष प्रस्ताव पारित करण्यात आला आणि त्यांना वयाच्या 18 व्या वर्षी वकिली व्यवसाय (प्रॅक्टिस) सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानतंर त्यांनी एस.सी.सहानी लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. पूर्ण केले.

जेठमलानी यांची ओळख फक्त एक वकील म्हणून नाही. ते राजकारणातसुद्धा तितकेच सक्रीय असतात. सलग दोनवेळा ते भाजपाकडून खासदार पदावर विराजमान झालेले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची धुराही सांभाळलेली आहे. सध्या राम जेठमलानी लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाकडून राज्यसभेचे खासदार आहेत.

फीस – 25 लाख रुपये चर्चेतील प्रकरणे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची केस लढविली होती. – स्मगलिंग प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याचा बचाव केला. – हवाला घोटाळ्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांची कोर्टात बाजू मांडली. – जेसिका लाल मर्डर केसमध्ये आरोपी मनु शर्मा यांची वकिली. – 2जी प्रकरणात कनिमाझी यांची बाजू कोर्टात मांडली. – आसाराम बापू यांच्या जामिनासाठी कोर्टात लढले. – भ्रष्टाचार प्रकरणात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची बाजू कोर्टात मांडली.

1975 साली राम जेठमलानी हे शिवसेना व भाजप यांच्या समर्थनाने उल्हासनगर येथून अपक्ष निवडणूक लढविली होतो परंतु यामध्ये त्यांचा प्रभाव झाला होता.
1980 मध्ये जेठमलानी कॅनडामध्ये होते. तेव्हा त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. आणीबाणीच्या दहा महिन्यानंतर ते भारतात परतले होते. 1985 च्या निवडणूकीत काँग्रेसच्या सुनिल दत्त यांनी त्यांचा पराभव केला.

1988 मध्ये जेठमलानी राज्यसभेचे सदस्य झाले. 2016 मध्ये राज्यसभा निवडणूकांदरम्यान दिलेल्या शपथपत्रात जेठमलानी यांनी संपत्ती घोषित केली. या निवडणूकीत लढणारे ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण 58 कोटी 82 लाख रुपयांची संपत्ती आहे. 1.36 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची रोलेक्स घड्याळ आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम 10 लाख एवढी आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *