” वाघा बॉर्डर न म्हणता , अटारी बॉर्डर म्हणा “

वाघा बॉर्डरवर होणारी Beating Retreat Ceremony हि जगप्रसिद्ध आहे. संपूर्ण जगातील पर्यटक येथे येतात भारत आणि पाकिस्तानची बोर्डर असणारा हा भाग परंतु आपणास अनेक गोष्टी या बद्दल माहिती नाही. काल सहजच या बॉर्डर विषयी माहिती घेताना प्रवीण कारखानीस यांचा लेख वाचण्यात आला आणि आपण किती मोठी चूक करत आहो हे लक्षात आले. या बाबत माहिती बघूया,

१९५९ पासून अटारी सीमेवर हि सेरेमनी म्हणजे कार्यक्रम घेण्यात येतो. सूर्यास्ताच्या वेळेस दोन्हीही देशाचे राष्ट्रध्वज उतरविल्या जातात. देशभक्तीने हा संपूर्ण माहोल भरलेला असतो. जगातील अनेक पर्यटक येथे येतात. हा कार्यक्रम विनाशुल्क असतो फक्त इथे लवकर पोहचावे लागते. सलग ४५ मिनिट चालणारा हा कार्यक्रम एखाद्या सिनेमातील सीन सारखा असतो. सैनिक आपले पाय अतिशय उंच उचलून खाली आदळतात त्याला Goose Marching असे म्हटल्या जाते.

अमृतसर पासून अटारी बॉर्डर २७ किमी आहे. अमृतसर येथून बसने आपण अटारी येथे पोहचू शकता. अटारी पासून ३किमी अंतरावर हि सीमारेषा आहे. इथे जाण्याकरिता रिक्षा वगैरे अनेक सुविधा उपलब्ध आहे. अटारीला २ च्या जवळपास पोहचणे सोयीस्कर आहे कारण इथे गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने जागा मिळण्याची शक्यता कमी असते. Beating Retreat Ceremony हि हिवाळ्यात ४:१५ला सुरु होते तर बाकी दिवस ५:१५ला सुरु होते. खासा येथे BSF च्या चौकीवर आपण याचे तिकीट बुक करू शकता. आयडी कार्ड घेऊन जाणें इथे आवश्यक आहे.

फोटो व्हिडीओ काढण्यास इथे मनाई नाही आहे. आता आपला मुख्य विषयी वाघा एवजी अटारी बोर्डर का म्हणायचं या विषयावर आपण परत वळूया तर वाघा नव्हे बाघा ( उर्दूत : बा गाह ) ही पाकिस्तानची सीमारेषा आहे. हि भारताची सीमारेषा नाही आहे.बाघा सीमेवर पाकचे रेंजर्स तैनात असतात. तिथे पाकचा राष्ट्रध्वज फडकविल्या जातो. या भागात पाकिस्तानचे इमिग्रेशन अधिकारी आणि कस्टम अधिकारी कार्यरत असतात. तर या उलट भारताची सीमा हि अटारी आहे.

रणजित सिंहाचे समकालीन युद्धकुशल सरदार श्याम सिंह अटारी यांचे नाव आपल्या सीमेला पूर्वीपासूनच दिलेले आहे. आपल्या सीमासुरक्षा दलातील जवानांची निवड हि वाघा सीमेवर होत नसून अटारी सीमेवर होत असते. आपले अधिकारी किंवा सैनिक सर्व अटारी सीमेवर असतात. भारताचा तिरंगा हा आपल्या भागात म्हणजे अटारी सीमेवरच असतो. त्यामुळे सर्वाना आवाहन आहे कि आपण आपल्या सीमारेषेचा उल्लेख करताना ” वाघा बॉर्डर न म्हणता , अटारी बॉर्डर म्हणा ”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर व लाईक करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *