क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारे एखाद्या फलंदाजाला आऊट होताना कधीच बघितले नसेल!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो. आजपर्यंत आपण अनेक फलंदाजांना विचित्र पद्धतीने बाद होताना बघितले आहे. पण नुकताच एक फलंदाज ज्यापद्धतीने बाद झाला, ते यापूर्वी पाहायला मिळाले नव्हते. हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून तो पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे. मैदानावरील पंचांनाही यावेळी नेमके काय करावे ते सुचले नाही, कारण यापूर्वी अशी घटना त्यांनीही पाहिली नसावी.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामधील महिलांच्या सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी होती. त्यावेळी न्यूझीलंडची केटी पेरकिन्स ही चार धावांवर फलंदाजी करत होती. त्यावेळी तिने हिथर ग्रॅहमच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्ह लगावला. हा चेंडू थेट नॉन स्ट्राइकला असलेल्या मार्टिनच्या बॅटवर आदळला. त्यानंतर या चेंडूला गोलंदाज ग्रॅहमने टिपले.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पंचांकडे कॅचचे अपील केले. मैदानावरील पंचांनाही नेमके काय करावे, ते समजले नाही. मैदानावरील पंचांनी यावेळी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी पेरकिन्स बाद असल्याचा निर्णय दिला आणि क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच फलंदाज असे बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

बघा व्हिडीओ-

न्यूझीलंडच्या बाबतीत हा प्रकार घडला असला तरी त्यांनीच हा सामना जिंकला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 323 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 157 धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने हा सामना 166 धावांनी जिंकला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *