अभिनंदन यांना सोडले म्हणून पाकचे हे रुप विसरु नका..

भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. त्यामुळे भारताचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडले. त्यामुळे संपूर्ण देश चिंतीत होता. मात्र जिनिव्हा कायद्याचे संरक्षण असल्याने युद्धबंदी असलेल्या भारतीय वैमानिकाला सोडणे बंधनकारक आहे.

त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून आज अभिनंदन यांची सुटका होणार आहे. पण अभिनंदन यांची आज जरी सुटका पाक करत असला तरी यापूर्वीचे पाकचे रूप हे विसरून चालणार नाही.अशाच काही घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. युद्धकैद्यांना पाकिस्तानने आजपर्यंत खूप वाईट वागणूक दिल्याचा इतिहास आहे. २० वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या वेळी देखील भारताचे ३ वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागले होते. आपल्या अनेक सैनिकांचा पाकिस्तानने छळ केलेला आहे. यामधील ३ मोठे उदाहरण म्हणजे स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा, कैप्टन सौरभ कालिया आणि फ्लाइट लेफ्टिनेंट नचिकेता हे आहेत. या तिघांपैकी नचिकेता यांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका करण्यात भारताला यश आलं होतं. खासरेवर जाणून घेऊया या तिघांची कहाणी..

स्क्वाड्रन लीडर अजय आहूजा-

१९९९ च्या कारगील युद्धा वेळी विमान कोसळून पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडलेल्या एका भारतीय वैमानिकाची पाकिस्तानने हत्या केली होती. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा असे त्यांचे नाव होते. कारगिल युद्धात हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर राबवून पाकिस्तानी घुसखोरांचे कंबरडे मोडले होते. त्या दरम्यान स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांच्याकडे भारतीय हद्दीत लपलेल्या पाकिस्तानी सैनिकांची पोझिशन शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. मात्र या मोहिमेदरम्यान २७ मे रोजी त्यांचे विमान शत्रूच्या हल्ल्यात सापडून कोसळले. यावेळी विमानातून पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडलेले आहुजा पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले.

मात्र अजय आहुजा यांना युद्धकैद्यासारखी वर्तणूक न देता पाकिस्ताननी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यांचा मृत्यू विमानातून पडून झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण आहुजा यांची हत्या झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले होते.

कैप्टन सौरभ कालिया

१९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानने केलेल्या घुसकोरीचा सौरभ कालिया आणि त्यांच्या टीमने शोध लावला. त्यानंतर पालमपूरचे सौरभ कालिया आणि त्यांच्या साथीदारांचे शव छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते. १५ मे १९९९ ला त्यांना आणि पाच साथीदारांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडले होते. त्यानंतर त्यांच्यवर प्रचंड अत्याचार करण्यात आले होते. पाकिस्तानने जेव्हा त्यांचे शव भारताकडे सुपूर्द केले होते तेव्हा त्यांच्या बॉडीचे अनेक पार्ट तोडलेले होते. त्यांच्या कानात गरम सळया खुपसलेल्या होत्या. एवढ्यावरच न थांबता त्यांचा डोळा देखील फोडण्यात आलेला होता. एवढे करूनही पाकिस्तानने त्यांचा मृत्यू खराब वातावरणामुळे झाल्याचा दावा केला होता.

फ्लाइट लेफ्टिनेंट के. नचिकेता-

‘ऑपरेशन सफेद सागर’ च्या वेळी नचिकेता हे देखील पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. नचिकेता यांनी मिग २७ विमानाने १७ हजार फुटांवरुन पाकिस्तानच्या तळांवर रॉकेट डागले. मात्र त्याचवेळी त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते क्रॅश झालं. त्यावेळी नचिकेता हे सुखरूप उतरले पण ते पाकव्याप्त काश्मीर मध्ये उतरले. त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्यानं शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. आठ दिवसानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *