अवघ्या काही तासात वाघ मायदेशी परतणार! असा असेल अभिनंदन यांचा परतीचा प्रवास..

भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायुदलाने पळवून लावलं. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. मात्र या कारवाईर भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यादरम्यान, भारताच्या वायूदलातील वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले.

अभिनंदन वर्धमान अपघातग्रस्त विमानातून पॅराशूटने बाहेर पडले. मात्र पाकव्याप्त काश्मिरमधील भिंबर जिल्ह्यातील एका गावात उतरले. त्यांनी ही कुठली जागा असल्याची विचारणा केली असता, एका नागरिकाने हा भारत असल्याची खोटी माहिती दिली. तिथे त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला पण तेथील लोकांनो दगडफेक केल्याने ते जखमी झाले व जास्त दूर पळू शकले नाही. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना अटक केली.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अवघ्या काही तासात मायदेशी परतणार आहेत. काल पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांनी अभिनंदन यांची आज सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले ”शांतीचा संदेश देताना आम्ही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका करु”.

असा असेल अभिनंदन यांचा परतीचा प्रवास-

अभिनंदन यांना सध्या इस्लामाबाद मध्ये ठेवण्यात आले आहे. आज दुपारी त्यांना विमानाने लाहोरला आणण्यात येईल. नंतर वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारताकडे सुपूर्द केले जाईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तिथून ते राजधानी दिल्लीला रवाना होतील.

अभिनंदन यांच्या परतीची वेळ अद्याप निश्चित झालेली नसली, तरी बीटिंग द रिट्रीटच्या वेळी त्यांना भारताकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *