चीननेही पाकिस्तानला दिला मोठा दणका! घेतला हा मोठा निर्णय..

पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात याविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. जगभरातून याचा निषेध करण्यात आला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर पोसत असल्याची टीका जगभरातून झाली.

जैश ए मोहम्मद सारख्या मोठ्या दहशतवादी संघटनेवर कारवाईची मागणी देशभरातून झाली. अमिरिकेने देखील पाकिस्तानला याबद्दल चांगलेच झापले होते. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने जैशच्या तळांवर एअरस्ट्राईक केला. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानवर केलेल्या या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा बेत आखला होता. पण वायुसेनेने त्यांना पळवून लावले.

पाकिस्तानने यामध्ये F-१६ हे विमान वापरण्यात आले होते. त्यासंबंधित पुरावे भारताने जाहीर केले होते. यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव चांगलाच वाढला आहे. जगभरातून अनेक देशांनी पाकिस्तानला दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले आहे. नुकतेच अमेरिकेने देखील पाकिस्तानला झापले होते. लष्करी कारवाई करायची असेल तर आधी देशातील दहशतवाद्यांवर करा, असा सल्ला पाकिस्तानला दिला आहे.

पाकिस्तानमधील या ऑपरेशनसाठी भारताला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रांससह अनेक देशांची साथ मिळाली असून आता यात अजून एक मोठे नाव जोडले गेले आहे. पाकिस्तानला नेहमी साथ देणाऱ्या चीनने पाकिस्तानला दणका दिला असून मोठा निर्णय घेतला आहे.

चीननं पाकिस्तानकडे ये-जा करणारी संपूर्ण हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊन चीनने देखील पाकिस्तानवर दहशतवाद संपवण्यासाठी दबाव टाकला आहे.

चीनने घेतलेला हा निर्णय पाकवर दबाव टाकण्यासाठी खूप महत्वाचा मानला जात आहे. दहशवाद्यांना पोसणारे पाकिस्तान सध्या एकटे पडल्याचे चित्र आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *