आताच्या घडीची सर्वात मोठी घोषणा! अशी होणार विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका..

आपले विग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या शोर्याची संपूर्ण देशात चर्चा आहे. पण त्या दिवशी काय झाले होते कि अभिनंदन हे पाकिस्तान मध्ये पोहचले. याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. तर जाणून घेऊया. २७ फेब्रुवरी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने आपल्या भागात घुसखोरी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्या विमानांना धडा शिकवण्याची जबाबदारी हि विग कमांडर अभिनंदन यांच्यावर सोपवण्यात आली होती.

त्या दिवशी काय झाले याबाबत ची माहिती इकॉनॉमिक्स टाइम्स ने अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांकडून घेतली त्यानुसार २७ तारखेला सकाळी सकाळी नौशेरा सेक्टर भागात १० पाकिस्तानी विमाने भारतीय सीमा भागात दिसली. त्या विमानाची हालचाल संशयास्पद होती. ते भारतीय सैन्य ठिकाणाकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसल्यावर भारतीय लष्कराने तात्काळ निर्णय घेत. २ मिग-२१ फायटर जेट आणि सुखोई ३० चे लढाऊ विमाने पाठवली. ती लढाऊ विमाने सीमेवर निगराणी करत होती.

या दरम्यान अभिनंदन यांच्याकडे मिग २१ विमान होते त्यांना पाकिस्तानी सैन्याचे एफ-१६ हे विमान भारतात घुसखोरी करतंय हे दिसल्यावर त्याचा पाठलाग अभिनंदन यांनी केला. त्यात हे विमान सीमा रेषा ओलांडून पाकिस्तान मध्ये गेले त्याचा पाठलाग अभिनंदन करत होते. ते पण त्या विमानाच्या मागे सीमारेखेच्या बाहेर गेले. त्यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ १६ वर मिसाइल आर-73 टाकली. त्यात हे विमान कोसळले. पाकिस्तानी हद्दीत असल्याने अभिनंदन यांच्या विमानावर देखील पाकिस्तान ने हल्ला केला. त्यात त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले त्यांनी त्यातून उडी घेतली व प्याराशुट द्वारे पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत उतरले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले.

संपूर्ण देशभरासाठी आनंदाची बातमी-

भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका होणार आहे. भारताकडून जो दबाव तयार करण्यात आला होता, त्याचे फलित म्हणजे अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा आहे. मागील काही तासात भारताने खूप मोठा दबाव पाकिस्तानवर टाकण्यात आला होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतीच याबाबत संसदेत घोषणा केली आहे. त्यांना उद्या भारताकडे सोपवण्यात येणार आहे. अंतराष्ट्रीय जिनेवा करारानुसार युद्ध बंदी सैनिका करिता काही नियम बनविण्यात आले आहे. या करारा अंतर्गत शत्रू सैन्याचा सैनिक ताब्यात आल्यास त्याला मारता येत नाही किंवा भीती दाखवणे , अपमान करणे किंवा युद्ध बंदी केले म्हणून जनतेत प्रचार करता येत नाही.

याच कायद्यानुसार अभिनंदन यांची उद्या सुटका होणार आहे. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *