सर्जिकल स्ट्राइक २ नंतर पाकिस्तानातील मृतांच्या फोटो बाबत काय आहे सत्य..

सध्या सोशल मीडिया वर काही फोटो वायरल होत आहेत ज्या फोटो मध्ये भारताने पाकिस्तानवर जी दुसरी सर्जिकल स्ट्राईक केली होती.तिचा संदर्भ देऊन काही डेड बॉडीज चे फोटो टाकले जात आहेत. पाक व्याप्त काश्मीर मध्ये हवाई दलाने जी १२ फायटर विमानाच्या माध्यमातून जी कार्यवाही करण्यात आली होती त्या कार्यवाही बाबत अजून सरकार व सैन्याने कोणतेही डिटेल्स दिले नाहीत.

कार्यवाही मध्ये काय केले आणि दहशतवाद्यांचे काय नुकसान झाले याचे डिटेल्स शेअर केले नाहीत पण सध्या दोनशे मारले तीनशे मारले असे काही आकडे देऊन मृतांचे फोटो वायरल केले जात आहेत. त्या फोटोना प्रचंड प्रमाणात शेअर केले जात आहे.

त्या फोटोवर पुढील प्रमाणे लिहिले जात आहे “पाकिस्तान विनाश और बर्बादी का जखीरा देख ले..ये तेरे पाक की तस्वीर है जो आज हुआ..

हिन्दुस्तान जिंदाबाद !!” अशा प्रकारे कॅप्शन लिहून फोटो वायरल केली जात आहेत. हि जी वायरल होणारे फोटोज आहेत ती खरेच पाकिस्तानी दहशतवाद्यांची आहेत का ? व भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्येच त्यांचा मृत्यू झाला याची आम्ही पडताळ केली तर काय माहिती समजली ते पाहूया.

पाकिस्तानी डेड बॉडीज चा फोटो म्हणून वायरल होणारे जे फोटोज आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. सर्वात पहिला फोटो हा बालकोट येथील आहे ज्यात २००५ मध्ये झालेल्या भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्या डेड बॉडीज चा आहे. दुसरा फोटो हा तो देखील पाकिस्तान मध्ये २०१७ साली आलेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा.जो खाटेवर मृतदेह आहेत असे फोटो आहेत तो अफगाण च्या सीमेवर शाळेवर झालेल्या हल्ल्यातील आहे.

२०१४ साली तालिबानींवर अमेरिकेने हल्ला केला होता त्यात काही दहशतवादी मृत्युमुखी पडले होते त्यांचा फोटोसुद्धा पाकिस्तानी सर्जिकल स्ट्राईक मध्ये मृत्यू झालेल्यांचा फोटो म्हणून वायरल केल्या जातो आहे.

या फोटोचा भारताने केलेल्या कार्यवाहीशी काही एक संबंध नाही आहे. असे पडताळणीत उघड झाले आहे. त्यामुळे चुकीचे फोटो खोट्या बातम्या आपण वायरल करू नये.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *