भारताने पाकिस्तानचे एफ१६ विमान पाडले त्याचे अवशेष इथे सापडले आहेत..

पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ १६चे अवशेष सापडले आहेत. परंतु पाकिस्तान आमचे विमान पाडले हे मान्य करायलाच तयार नाही. २७ फेब्रुवरीला दोन्ही देशात झालेल्या विमान हल्यात पाकिस्तानचे एक लढाऊ विमान एफ़१६ उध्वस्त झाले होते. परंतु याबद्दल अधिकृत बातमी आत्तापर्यंत मीडियात आली नव्हती तर आज न्यूज एजन्सी एएनआय यांनी आपल्या सूत्राच्या माहितीनुसार हि बातमी दिली आहे कि पाकिस्तान ताब्यात असलेल्या कश्मीर मध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान एफ१६चे अवशेष सापडले आहे.

या सर्व अवशेषांची तपासणी करताना पाकिस्तान आर्मीचे ७ नॉर्दन लाईट इन्फैंट्रीचे कमांडीग ऑफिसर दिसत आहेत. त्या वेळेस काय झाले होते ? खाली वाचा

भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानात चकमक झाली. हि चकमक जम्मू-कश्मीर मधील नौशेरा या भागात झाली. हा भाग पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषे जवळ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे १० लढाऊ विमाने नियंत्रण रेषे जवळ दिसल्या नंतर हि चकमक झाली. भारतीय सीमेकडे त्याची कूच होती त्यानंतर भारताने मिग-21 फाइटर जेट आणि सुखोई 30 कॉम्बैट एयर लॉन्च करण्यात आले. मिग-21 घेऊन अभिनंदन यांनी पाकिस्तानि एफ१६चा पाठलाग केला आणि मिसाइल आर-73 कमी अंतरावरून सोडण्यात आली.

आणि पाकिस्तानचे एफ१६ विमान हे उध्वस्त झाले. हि नजरा भारताच्या सिमेलगतच्या भागातून देखील बघायला मिळाला आहे. पाकिस्तानच्या एफ १६ विमानाच्या जोरावर उडत होता त्याचे असे हाल बघण्याचा कधी त्याने विचार देखील केला नसेल. मुळात एफ१६ हे पूर्ण विमान नसून विमानातील इंजिन आहे. आवाजापेक्षा हि अधिक स्पीडने धावणारे हे विमान अमेरिकन सैन्याने ७०च्या दशकात बनविले होते.

त्यानंतर जनरल डायनैमिक्स ने फाइटर एयरक्राफ्टचा हा बिजनेस लॉकहीड मार्टिन यांना विकला आणि सध्या लॉकहीड मार्टिन या विमानाची निर्मिती करतात. एफ१६ वजनाने हलका असल्याने एकदम जलद गती घेतो आणि त्याची एयरोडायनॉमिक्स देखील चांगली आहे. अमेरिका आणि इतर २६ देश या विमानाचा वापर करतात. आत्तापर्यंत ४५०० पेक्षा अधिक एफ१६ विमान बनविण्यात आले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *