हवेत उडणारे विमान आपलं कि शत्रूचं कसं कळणार? वाचा कसं ओळखलं जातं शत्रूचं विमान..

भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात हवाई दलानं पाकिस्तानच्या कारवायांची आणि त्याला भारताच्या बाजूनं देण्यात आलेल्या प्रत्युत्तराची माहिती दिली. यावेळी भारतीय हवाई दलानं अनेक पुरावे सादर करून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला.

नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीर आणि खैबर पख्तुनख्वामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास केलेली कारवाई यशस्वी ठरल्याची माहिती जी. के. कपूर यांनी दिली. पाकिस्ताने भारताच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी एफ-16 विमानाचा वापर केला होता. पण पाकिस्तानने या विमानाचा वापरच केला नाही असा दावा केला होता.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत भारताकडून ते विमान एफ-16 च होते याचे पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे. पाकिस्तानचे एफ-16 विमानं नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या लष्करी तळावर हल्ला करण्यासाठी आले होते पण भारतीय वायुदलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत पळवून लावले होते. तर पाकिस्तानचे एक एफ-16 विमान देखील भारताने पाडले होते.

पण बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडत असेल कि हवेत हल्ला करण्यासाठी आलेले विमान शत्रूचे आहे हे कसे ओळखले जाते. याचे उत्तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत वायुदलाकडून मिळाले आहे. विमान ओळखण्यासाठी वायूदलाकडे एक विशेष यंत्रणा आहे.

या विशेष यंत्रणेचा वापर करून हवेत उडणारे विमान कोणतं आहे हे वायुदलाला तात्काळ कळतं. या यंत्रणेसाठी विमानांचे एक विशिष्ट तांत्रिक संकेत वापरले जातात. प्रत्येक विमानाचे एक तांत्रिक संकेत असते. याच संकेतावरून पाकिस्तानने कारवाईत एफ-16 वापरले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- पुलवामा हल्ला आणि अभिनंदन यांच्या सुटकेच्या बातम्या येत नाहीत तोवर चित्रपट निर्मात्यांनी केलेली ही गोष्ट लज्जास्पद आहे!

हे हि वाचा- असे काय घडले त्या दिवशी ज्यामुळे अभिनंदन सापडले पाकिस्तानच्या ताब्यात..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *