पुलवामा हल्ला आणि अभिनंदन यांच्या सुटकेच्या बातम्या येत नाहीत तोवर चित्रपट निर्मात्यांनी केलेली ही गोष्ट लज्जास्पद आहे!

पुलवामा हल्ल्याचे जखम अजूनही ताजे आहेत. भारताने आपले ४३ वीरपुत्र गमवले परंतु बॉलीवूडमध्ये जो प्रकार सुरु आहे तो अगदी निंदनीय आहे. नुकतेच हफिंगपोस्ट साईटने एक स्टिंग केले आणि त्यामध्ये हा विकृतपणा पुढे आलेला आहे. नेमका काय प्रकार आहे आज आपण याबाबत खासरेवर माहिती घेऊया,

संपूर्ण स्टोरी अशी आहे एक वृद्ध डायरेक्टर आपल्या सहायकाला बोलतो कि “PULWAMA: THE DEADLY ATTACK” कैसा लागा ? तर तो अचानक बोलतो मी अजून एक सांगतो “Pulwama Attack Versus Surgical Strikes 2.0” त्यांचा सहायक बोलतो कि सर दुसर बघव लागेल कारण “पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हे सगळी नावे गेली आहेत.”

वरच्या चर्चेवरून तुम्हाला अंदाज लागला असेल कि आम्ही कशा बद्दल बोलत आहो “भारतीय चित्रपट निर्माते अभिनंदन, पुलवामा, बालाकोट नावाचे सिनेमे रजिस्टर करून देशभक्ती विकण्यासाठीची उत्पादने निर्मितीला चढाओढ लागली आहेत. अभिनंदन वर्थमान अजून भारतात देखील परत आले नाही पण त्यांच्या नावाचा सिनेमा सुध्दा रजिस्टर करायला गर्दी झाली आहे.

Indian Motion Pictures’ Producers’ Association (IMMPA) येथे २६ तारखेला चांगलीच गर्दी झाली होती. यांचे ऑफिस अंधेरी येथे आहे मोठ मोठ्या बैनरच्या ५ कंपन्या इथे नाव रजिस्टर करायला आल्या होत्या. इथे काम करणारा एक कर्मचारी सांगतो कि सगळ्या मोठ्या निर्मात्याची इथे खिचडी झाली होती. सर्वाना हि नावे रजिस्टर करायची होती.

उरी सिनेमाच्या यशानंतर अनेक सिनेनिर्माता देशभक्तीचे सिनेमे बनवत आहेत. या सिनेमातील डायलॉग हाऊ इज द जोश या नावाने देखील दोन सिनेमे विक्रम मल्होत्रा यांच्या Abundantia Entertainment ने रजिस्टर केलेले आहे.

१४ फेब्रुवरीच्या घटनेकरिता पुढील नावाचे चित्रपट रजिस्टर झालेले आहेत. दि सर्जिकल स्ट्राईक, वार रूम, हिंदुस्तान हमारा है, पुलवामा टेरर अटेक, दि अटेक ऑफ पुलवामा, विथ लव्ह फ्रॉम इंडिया आणि ATS- वन मेन शो.

२७ फेब्रुवरीला IMMPA चा कर्मचारी सांगतो कि, मोठ्या प्रमाणात पुलवामा आणि बालाकोट विषयावर सिनेमाचे नाव येत आहे. त्यापैकी काही प्रसिद्ध कंपनी Abundantia आणि T Series हे आहेत. सिनेमाचे नाव रजिस्टर करायला एक फॉर्म आणि ४ वेगवेगळी नावे व २५० रुपये १८% जीएसटी सहित भरावी लागतात. बरेच लोक याचे चित्रपट देखील बनवत नाही ते हे चित्रपटाचे अधिकार मोठ्या कंपन्याना विकतात.

अभिनंदन वर्थमान हे भारतात देखील परतले नाही तरी सुध्दा त्याच्या नावाने अनेक चित्रपट रजिस्टर होत आहेत त्यापैकी Abhinandan किंवा Wing Commander Abhinandan हे नावे बाकी आहेत असे कर्मचार्यांनी सांगितले. लवकर अर्ज न केल्यास हे नावे देखील जातील असे सांगण्यात आले.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *