पाकिस्तानच्या ताब्यात असलेले अभिनंदन वर्थमान यांच्या वडिलांचे भारतातील जनतेस भावूक पत्र..

भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाक व्याप्त काश्मीर मध्ये हवाई दलांच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली त्यानंतर आज २७ फेब्रु रोजी पाकिस्तानी आर्मी ने भारतात घुसखोरी केली. पाकिस्तानच्या विमानांना हुसकावून लावताना आपल्या हवाई दलाचे एक विमान पाकिस्तान मध्ये कोसळले त्यात आपल्या हवाई दलाचा एक पायलट ज्याचे नाव अभिनंदन वर्थामान आहे त्याला पकडण्यात पाकिस्तानी आर्मीला यश आले आहे. याबाबत चा दुजोरा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

अभिनंदनचे वडील देखील निवृत्त एअर मार्शल आहे व त्यांनी नुकतेच एक पत्र सर्वाकरिता प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते लिहतात कि “”Thank you my friends for your concern and wishes. I thank God for his blessings, Abhi is alive, not injured, sound in mind, just look at the way he talked so bravely…a true soldier… we are so proud of him. I am sure all your hands and blessings are on his head , prayers for his safe return, I pray that he does not get tortured, and comes home safe and sound in body and mind. Thank you all for being with us in this hour of need. We draw our strengths from your support and energy,”

मराठी अनुवाद‘माझ्या मित्रांनो, तुमची काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या धाडसाने बोलत आहे ते पाहा….एक खरा जवान…. आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे. तुमच्या आशीर्वादाचे हात त्याच्या डोक्यावर आहेत, त्याच्या सुखरुप सुटकेसाठीच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत, याची मला खात्री आहे. त्याचा छळ होऊ नये तसंच शरीर आणि मनाने सुखरुप मायदेशी परतेल यासाठी मी प्रार्थना करतो. अशा नाजूक क्षणी तुम्ही आमच्यासोबत आहात, यासाठी मी आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि ऊर्जेमुळे आम्हाला बळ मिळाले आहे.’

अभिनंदन रत येण्या करिता #GivebackAbhinandhan , #BringBackAbhinandan हे hashtag सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. भारत नाही तर पाकिस्तान मधून काही सेलिब्रिटीनि देखील या कैम्पेनला पाठींबा दिला आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *