असे काय घडले त्या दिवशी ज्यामुळे अभिनंदन सापडले पाकिस्तानच्या ताब्यात..

आपले विग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या शोर्याची संपूर्ण देशात चर्चा आहे. पण त्या दिवशी काय झाले होते कि अभिनंदन हे पाकिस्तान मध्ये पोहचले. याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. तर जाणून घेऊया. २७ फेब्रुवरी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने आपल्या भागात घुसखोरी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्या विमानांना धडा शिकवण्याची जबाबदारी हि विग कमांडर अभिनंदन यांच्यावर सोपवण्यात आली होती.

त्या दिवशी काय झाले याबाबत ची माहिती इकॉनॉमिक्स टाइम्स ने अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांकडून घेतली त्यानुसार २७ तारखेला सकाळी सकाळी नौशेरा सेक्टर भागात १० पाकिस्तानी विमाने भारतीय सीमा भागात दिसली. त्या विमानाची हालचाल संशयास्पद होती. ते भारतीय सैन्य ठिकाणाकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसल्यावर भारतीय लष्कराने तात्काळ निर्णय घेत. २ मिग-२१ फायटर जेट आणि सुखोई ३० चे लढाऊ विमाने पाठवली. ती लढाऊ विमाने सीमेवर निगराणी करत होती.

या दरम्यान अभिनंदन यांच्याकडे मिग २१ विमान होते त्यांना पाकिस्तानी सैन्याचे एफ-१६ हे विमान भारतात घुसखोरी करतंय हे दिसल्यावर त्याचा पाठलाग अभिनंदन यांनी केला. त्यात हे विमान सीमा रेषा ओलांडून पाकिस्तान मध्ये गेले त्याचा पाठलाग अभिनंदन करत होते. ते पण त्या विमानाच्या मागे सीमारेखेच्या बाहेर गेले. त्यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ १६ वर मिसाइल आर-73 टाकली. त्यात हे विमान कोसळले. पाकिस्तानी हद्दीत असल्याने अभिनंदन यांच्या विमानावर देखील पाकिस्तान ने हल्ला केला. त्यात त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले त्यांनी त्यातून उडी घेतली व प्याराशुट द्वारे पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत उतरले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले.

पाकिस्तानी सैन्याच्या विमानांनी तीन वेगवेगळ्या एअरबेस वरून उड्डाण केले होते.तसेच त्यांच्याकडे टू सीटर विमाने होती. त्यांना भारतातील सैन्य ठिकाणावर हल्ला करता आला नाही. आपल्या मिग २१ ने पाकिस्तानचे एफ १६ विमान उडवले हे जमिनीवरून सैन्याने पाहिले. असा होता त्या दिवशीचा दिनक्रम.

माहिती पटल्यास अवश्य शेअर व लाईक करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपण माहिती info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *