सर्जिकल स्ट्राईक २ नंतर अमेरिकेने काय घेतली भूमिका ??

जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकेची जगभर ओळख आहे. त्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेकडे नेहमीच लक्ष असते. आता भारत आणि पाकिस्तान यांच्या मध्ये तणावाचे वातावरण आहे. या दोन्ही देशातील तणावाच्या पाश्वभूमीवर अमेरिकेने आपली भूमिका मांडली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांनी एक लिखित स्टेटमेंट दिले आहे.

माइक पोंपियो यांच्या लिखित स्टेटमेण्टमध्ये त्यांनी पाकिस्तान ला कानपिचक्या दिल्या आहेत कि त्यांनी आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना थारा देऊ नये त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करावी.आपल्या भूमीचा वापर दहशतवादा साठी होऊ देऊ नये. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणे करून दोघांनी शांती राखावी असेही म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्री माइक पोंपियो यांनी मीडियाला काय अधिकारीक स्टेटमेंट दिले आहे ते पाहू ” २६ फेब्रुवारी रोजी भारताने आतंकवादाच्या विरोधात जी काही कार्यवाही केली त्याबद्दल मी सुषमा स्वराज यांच्या सोबत बातचीत केली. भारतासोबत आमचे सुरक्षा संबंध मजबूत आहेत.हे संबंध प्रदेशात शांती व सुरक्षितता निर्माण करण्यासाठी महत्वाचे आहेत.त्याच सोबत माझे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह मुहंमद कुरेशी यांच्याशी बोलणे झाले. त्यांना सांगितले कि सैन्य कार्यवाही ऐवजी त्यांनी देशातील दहशतवाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांना मी दोन्ही देशांनी संवाद करावा व सीमेवर शांतता राखावी असे आवाहन केले आहे”.

या घडामोडीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले आहे ते पाहणे हि महत्वपूर्ण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान ला आतंकवाद्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करावी असे म्हटले आहे तसेच अमेरिका दरवर्षी पाकिस्तान सैन्यासाठी जी मदत देते ती मदत हि रोखली आहे. आपल्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ देऊ नये असे डोनाल्ड ट्रम्प ने पाकिस्तान ला सांगितले आहे.

एकूण अमेरिकेची भारताबद्दलची भूमिका सकारात्मक आहे. अमेरिकेला दोन्ही देशात शांतता हवी आहे. तसेच दोन्ही देशांनी चर्चा करून मार्ग काढावा असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *