पाकिस्तानने बंदी बनविले तर फ्लाईट लेफ्टनंट कम्बम्पति नचिकेता हरले नाही..

नुकताच परराष्ट्र मंत्रालयाने एक बातमी प्रसिद्ध केली आहे कि पाकिस्तान मधून भारतीय सैन्याचे एक पायलट परत आले नाही आहे. कारगिल युद्धाच्या वेळेस असाच काही प्रसंग आला होता. कारगिल युद्ध हे भारतीय सैन्याचे सर्वात कठोर युध्द होते. या युद्धात अनेक सैनिकांनी आपला पराक्रम गाजवला होता. ज्यापैकी काही घटना आपल्याला माहिती आहे आणि काही घटना इतिहासात पूसट झालेल्या आहेत.

हि गोष्ट आहे फ्लाईट लेफ्टनंट कम्बम्पति नचिकेता यांची आहे, शत्रूच्या भागात फसून सुध्दा ते सुखरूप वापस आले. २८ मे १९९९ला पाकिस्तानी सैन्याद्वारे भारताचे एक विमान पाडण्यात आले. याच विमानाचे पायलट नचिकेता होते त्यांना पाकिस्तानने एक आठवडा युद्धकैदी म्हणून ठेवले नंतर ४ जून १९९९ ला त्यांना भारतास परत देण्यात आले.

अंतराष्ट्रीय दबावामुळे हे सर्व घडले होते. या अपघातात त्यांचा पाठीचा कणा तुटला होता अनेकांना वाटल नचिकेता परत विमान उडवू शकणार नाही परंतु ते सध्याही भारतीय सैन्यात कार्यरत आहे. १९९९च्या कारगिल युद्धात नचिकेता ९ नंबरच्या भारतीय वायू दलाच्या विभागात कार्यरत होते. १७,००० फुट उंचीवरून त्यांनी शत्रूवर मिसाईलचा मारा केला होता.

२७ मे ला त्यांच्या मिग २६ विमानावर ३० एमएमच्या मिसाईलचा मारा करण्यात आला त्यामध्ये त्यांच्या लढाऊ विमानाचे इंजिन बंद पडले. अनेक प्रयत्न करून विमान सुरु न झाल्याने त्यांनी पेराशूटच्या मदतीने उडी घेतली आणि मुन्थुदालो या भागात उतरले हा भाग संपूर्ण बर्फाने व्यापलेला होता. पहाडावर त्यांनी बघितले त्यांना आभाळात एक लहान बिंदू दिसला.

तो बिंदू म्हणजे त्यांचे साथीदार अजय आहूजा हे त्यांना दुसर्या विमानाने शोधत होते परंतु पाकिस्तानी अंज़ा मिसाइलचे त्यांचे विमान शिकार झाले. त्यानंतर अर्ध्या तासाने पाकिस्तानी सैन्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे रावलपिंडी येथील कारागृहात त्रास देण्यात आला. परंतु नचिकेता त्यांच्या समोर कधीच झुकले नाही.

तो सांगतो कि त्याला मारू मारू मारून टाकायचे होते परंतु तिथे एक वरिष्ठ अधिकारी आला आणि त्यांनी सैन्यास सांगितले कि हे युद्धबंदी आहे त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. ३ जून १९९९ ला अंतराष्ट्रीय दबाव व मिडियाचा दबावामुळे त्यांना इंटरनेशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसला देण्यात आले. त्यानंतर त्यांना भारतात आणण्यात आले.

नचिकेता यांनी परत सैन्याचे प्रशिक्षण घेऊन भारतीय वायुसेनेच्या परिवहन विभागात कार्यरत झाले. नचिकेता सांगतात कि एका पायलटचे हृद्य कॉकपिटमध्ये असतो. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *