काही होणार नाही भारतीय वायू सेनेच्या पायलटला, जाणून घ्या कारण

विदेश मंत्रालायचे प्रवक्ता रविश कुमार यांनी सांगितले आहे कि पाकिस्तानने केलेल्या जवाबी हमल्यात भारतीय वायू सेनेचा एक पायलट पाकिस्तान मधून परत आला नाही आहे. आणि सोशल मिडीयावर नुकतेच वायरल झालेल्या व्हिडीओ मुळे आपल्याला हा सैनिक कोण आहे हे माहिती झाले आहे. परंतु युद्धकैदी करिता काही नियम आहेत जे अनेकांना माहिती नाही ते आज आपण खासरे वर बघूया,

अंतराष्ट्रीय जिनेवा करारानुसार युद्ध बंदी सैनिका करिता काही नियम बनविण्यात आले आहे. या करारा अंतर्गत शत्रू सैन्याचा सैनिक ताब्यात आल्यास त्याला मारता येत नाही किंवा भीती दाखवणे , अपमान करणे किंवा युद्ध बंदी केले म्हणून जनतेत प्रचार करता येत नाही.

जिनेवा अंतराष्ट्रीय संधी हि दुसऱ्या विश्वयुधानंतर १९४९ साली बनविण्यात आली होती. या नियमाचा मुख्य उद्देश मानवी मूल्याचे पालन करणे हे आहे त्यासाठी हा करार करण्यात आला होता. अंतराष्ट्रीय रेड क्रॉस संघटना याच साठी काम करत असते. संपूर्ण जगातील युद्ध कैद्या करिता हि संस्था काम करते. १९९९९ च्या युद्धात याच मुले नचिकेता हे भारतीय पायलट परत भारतात सुखरूप आले होते.

जिनेवा करारा नुसार युद्धबंदी सैनिकावर केस केल्या जाऊ शकते आणि त्या देशाच्या संविधाना नुसार हि केस चालते किंवा युद्ध झाल्यावर त्यांना त्यांच्या देशाला परत केल्या जाऊ शकते. पकडल्या नंतर सैनिकाने आपले नाव, पद इत्यादी शत्रूस सांगणे अनिवार्य आहे. जखमी सैनिकावर उपचार करणे सुध्दा या करारात उल्लेख केला आहे.

जर या संधीचे उल्लंघन झाले आणि याची केस मानवी हक्क अधिकार संघटना हि अंतराष्ट्रीय न्यायालयात हि केस लढविल्या जाते आणि दोषी आढळलयास या मध्ये मृत्यूदंडाची सुध्दा तरतूद केलेली आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आम्हाला आपली माहिती info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *