इंडियन एअरफोर्स पायलट अभीनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहे का ?

भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ वायरल झालेले आहे. नुकताच एक व्हिडीओ पाकिस्तानी मिडिया वायरल करत आहे ज्यामध्ये एका पायलटला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याबाबत काय सत्य आहे आपण जरा याबाबत माहिती घेऊया,

पाकिस्तानी मिडीयाच्या दाव्यानुसार भारताचे फ्लाईट पायलट यांना अटक करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ त्यांनी वायरल केला आहे. या व्हिडीओ मधील जवान आपले नाव अभिनंदन आहे हे सांगत आहे. या व्हिडीओ मधील अभिनंदन नावाचा जवान सांगत आहे कि त्याचे नाव अभिनंदन व सर्विस नंबर २७९८१ आहे आणि तो फ्लाईट पायलट आहे. या बाबत भारता तर्फे कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही आहे.

पाकिस्तानी सैन्याचे डीजी जनरल गफूर यांनी सांगितले आहे कि पाकिस्तानला युध्द नाही पाहिजे आणि शांतीने आणि चर्चेनि या गोष्टीवर उपाय शोधायला हवा. पाकिस्तानने सांगितले आहे कि या जवानाला कुठलाही त्रास देण्यात येणार नाही आहे. पाकिस्तानी संविधानाच्या नियमानुसार त्याला वागविण्यात येणार आहे. पाकिस्तान नेहमी सांगत आहे कि आता गोष्ट भारताकडे आली आहे त्यांनी ठरवावे युद्ध करावे कि चर्चेने हा विषय संपवावा.

इंडियन एयरफोर्सने आत्तापर्यत या पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीला दुजोरा दिला नाही आहे. परंतु अभिनंदन यांच्या विषयी माहिती भारत रक्षक डॉट कॉम वर आहे. हि ऑफिशियल वेबसाईट आहे इथे इंडियन एअर फोर्सची माहिती आपणास मिळू शकते. पाकिस्तानी मिडियाची हि गोष्ट सत्य असल्यास भारता करिता हि एक वाईट बातमी आहे.

तसेच रीयाफत वाणी ऑफिशियल जी स्वतःला कश्मीरी समाज सेवक समजते तिने सुध्दा या सैनिकाचे कागदपत्र आणि काही फोटो सोशल मिडीयावर टाकलेले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण हे बघू शकता.

जर हि गोष्ट सत्य असेल तर भारता करिता हि एक वाईट बातमी आहे आणि आपला जवान लवकर त्यांच्या ताब्यातून भारतात यावा. आपल्या कडील या घटने संबंधी माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *