कथा भारताच्या पहिल्या हवाई हल्ल्याची नक्की वाचा… जयंतकुमार सोनवणे यांचा लेख

पश्चिम पाकिस्तानच्या थलसेनेने भारताच्या पंजाब, राजस्थान फ्रंटवर धुमाकूळ घातला होता. भारतीय सेना सुद्धा निकराचा लढा देत मुकाबला करत होती. पाकिस्तानच्या सेनेकडे असलेल्या अमेरिकन बनावटीच्या पॅटन रणगाड्यांपुढे भारतीय रणगाड्यांचा निभाव लागत नव्हता. कच्छ मध्ये सुद्धा पाकिस्तानी इन्फ्रन्ट्रीने हालचाली केल्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची नौबत आली होती.

दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील वॉर रूममध्ये तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांसोबत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू होती. थळसेनेच्या प्रमुखांनी बाजू मांडली की, आता ह्या क्षणाला एअर ऍटॅक केला नाही तर आपण हे युद्ध हरणार ! संरक्षण मंत्र्यांनी वायुसेना प्रमुखांकडे कटाक्ष टाकला.

“हमें कितने समय में एअर ऍटॅक लॉन्च करना होगा?” “बस.. पांच मिनट सर !” संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला ट्रंक कॉल केला, पण पंतप्रधान शास्त्रीजी कार्यालयात नव्हते. एक दीर्घ श्वास घेऊन संरक्षण मंत्री म्हणाले.. “एअर ऍटॅक टू बी लॉन्च्ड..!! अब इस हमले की जिम्मेदारी मेरी !”

पुढच्या पाचव्या मिनिटाला भारतीय वायुसेनेने एअर चीफ मार्शल अर्जन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनादलांच्या इतिहासातील पहिला हवाई हल्ला केला. पुढचा इतिहास तुम्ही बॉर्डर चित्रपटात पाहिला आहेच. युद्धबंदी जाहीर झाली नसती तर पुढच्या विसाव्या मिनिटाला पूर्ण लाहोर शहर भारतीय सेनेच्या ताब्यात असतं.

तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या डायरीत ही घटना नोंदवून ठेवली होती. यशवंतराव चव्हाण लिहितात, “If We Fail And I Cannot Even Imagine Of It The Nation Fails .” – या युद्धात आपण हरलो तर राष्ट्र हरेल ही मी कल्पना सुद्धा करू शकत नाही !

अभ्यासू लोकांसाठी पुस्तकाची लिंक : 1965 War, The Inside Story: Defence Minister Y.B. Chavan’s Diary Of India-Pakistan War

यशवंतरावांनी पुढील राजकीय आणि सामाजिक आयुष्यात ह्या घटनेचा कुठे उल्लेख केला ना ह्या गोष्टींचा डंका पिटुन मतांची भीक मागितली. बाकी आपला मेसेज लाऊड आणि क्लिअर आहे, ज्याने त्याने आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आकलनशक्तीनुसार अन्वयार्थ काढावा.

– जयंतकुमार सोनवणेआपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *