हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांच्या कुटुंबीयाची प्रतिक्रिया व्यक्त केले हे मत..

भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाक व्याप्त काश्मीर मध्ये हवाई दलांच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली त्यानंतर आज २७ फेब्रु रोजी पाकिस्तानी आर्मी ने भारतात घुसखोरी केली. पाकिस्तानच्या विमानांना हुसकावून लावताना आपल्या हवाई दलाचे एक विमान पाकिस्तान मध्ये कोसळले त्यात आपल्या हवाई दलाचा एक पायलट ज्याचे नाव अभिनंदन वर्थामान आहे त्याला पकडण्यात पाकिस्तानी आर्मीला यश आले आहे. याबाबत चा दुजोरा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

आज हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांचे काही व्हिडीओज पाकिस्तान ने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावर अनेकांनी फेक व्हिडीओ म्हणून पोस्ट केल्या होत्या भारतीय मीडियाने हि हि बातमी नाकारली होती.पण आता पाकिस्तान चा दावा सत्य निघाला आहे. अभिनंदन हे भारतीय हवाई सेनेचे पायलट आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी कबूल केले कि एक भारतीय विमान व पायलट मिसिंग आहे. त्यांनी कोणाचे हि नाव घेतले नाही.पण सध्या पाकिस्तानने जे व्हिडीओ प्रसारित केले त्यावरून अभिनंदन हेच आहेत हे दिसून येतेय.

टीव्ही चॅनल वर अभिनंदन यांच्या बाबतचे फुटेज पाहून आता त्यांच्या कुटुंबीयांनी हि आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबत द हिंदू च्या पत्रकाराने असा दावा केलाय कि त्याने अभिनंदन यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे. त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या काका सोबत ते बोलले आणि त्यांच्या काकाने मान्य केलंय कि ते विग कमांडर अभिनंदन आहेत. ते चेन्नई येथे राहतात.

अभिनंदन यांचे व्हिज्युअल पाहून त्यांचा परिवार दुखी झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकार कडे मागणी केली आहे कि त्यांनी लवकरात लवकर अभिनंदन यांना वापस आणावे. त्यासाठी सर्व कुटुंब त्यांचे प्राण डोळ्यात आणून वाट पाहत आहे. अभिनंदन सोबत कोणताही दुर्व्यहार आम्ही करणार नाही असे पाकिस्तान ने हि सांगितले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *