या गोष्टीमुळे भारताचे मिराज पाकिस्तानात 40 किमी घुसूनही पाकिस्तानला कळले नाही !

१४ फेब्रुवरीला झालेला पुलवामा येथील भ्याड हल्यामुळे ४० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून आज भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवाडी स्थळे उडविण्याचा धमाका सुरु केला. तब्बल १००० किलो वजनाचे बॉम्ब पाकिस्तानवर टाकण्यात आले. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता हा हल्ला करण्यात आला. परंतु पाकिस्तानी सीमेत घुसून पाकिस्तान गाफील कसा राहिला आज बघूया,

या बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर भारतीय लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा म्हणाले की या ठिकाणी जैश ए मोहमद च्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्या जात होते. जैश ए मोहमद हि आतंकवादी संघटना पुलवामा हल्ल्यास कारणीभूत आहे. पुलवामा हल्यानंतर जे झाले त्याचे उत्तर देणे आवश्यक होते कारण भारताची प्रतिमा जगात वेगळ्या प्रकारे गेली असती.

त्यांनी पाकिस्तानात जाऊनही भारताचे जेट का का पाकिस्तानच्या रडार मार्फत सापडले नाही तर तर त्यांनी सांगितले कि “हे एअर स्ट्राइक पूर्णपणे प्रोफेशनल होतं. याशिवाय विशेष मार्ग वापरण्यामुळे आणि उच्च क्षमता असलेल्या जॅमरचा वापर केल्यामुळे हे एअर स्ट्राइक यशस्वी झालं आणि पाकिस्तानच्या रडारमध्ये भारतीय जेट विमान आले नाहीत. भारतीय वायुसेना ही पाकिस्तानी सेनेपेक्षा तांत्रिकदृष्ट्या खूप पुढे आहे.”

हुड्डा म्हणाले कि भारत स्वतः कधीच हल्ला करत नाही आणि हल्ला झाल्यावर शांत सुध्दा राहत नाही. सुरवात त्यांनी केली आणि उत्तर भारताने दिले आहे. उरीच्या वेळेस हि याच प्रमाणे घडले होते. हल्ला करताना भारतीय वायू दलाने हि काळजी घेतली कि हल्ला झाल्यावर कुठल्याही सामान्य नागरिकाची जीवितहानी होऊ नये.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या अड्रेसवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *