भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचा हा व्हायरल व्हिडीओ निघाला खोटा..

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर सफोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.

आज भारताने निंयत्रण रेषा ओलांडली. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक केला. 1 हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे.

पुलवामा हल्याचा बदला हा प्रत्येक भारतीयाचे स्वप्न होते. पाकिस्तानवर हल्ला करा बदला घ्या हे सगळ्यांची इच्छा होती. भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर 1 हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. यासंबधीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. प्रामुख्याने पाकिस्तानी युजर्सकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण या व्हिडिओची सत्यता तपासली असता तो व्हिडीओ एअरस्ट्राईकचा नसल्याचे समोर आले आहे.

हा व्हिडीओ एअरस्ट्राईकच्या अगोदरच युट्युबवर उपलब्ध असल्याचे पडताळणीमध्ये समोर आले आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ आपण खाली दिलेल्या लिंकवर बघू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *