भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची हि कुरापत समोर!

भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज पहाटे ३.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. भारताने १० मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर १ हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.

नुकतेच भारताने सीमेवर सैन्यबळ वाढवले होते. यावरून काही तरी हालचाली चालू आहेत अशी शक्यता वाटत होती. आज भारताने पहाटेच हा हवाई हल्ला करून पाकिस्तानला मोठी अद्दल घडवली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर सफोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.

त्यानंतर आज झालेल्या या कारवाईने सर्वत्र भारतीय वायुसेनेचे कौतुक करण्यात येत आहे. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे.

पाकिस्तनची हल्ल्यानंतर कुरापत-

हा हल्ला झाल्यानंतर भारतीय वायुसेनेने हाय अलर्ट जारी केला आहे. या हल्ल्यानंतर गुजरातच्या कच्छच्या सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन फिरताना समोर आले आहे. या ड्रोनला भारतीय लष्कराने नष्ट केले आहे. हे ड्रोन संशयास्पद फिरताना समोर आले आहे.

पाकिस्तानमध्ये देखील उच्चस्तरीय बैठका सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय लष्कर आणि वायुसेना देखील सतर्क आहे. भारतीय हद्दीत हे पाकिस्तानी ड्रोन फिरताना दिसताच लष्कराने ते नष्ट केले आहे. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हि घटना घडली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *