भारताने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल पाकिस्तानी नेते काय म्हणताय..

भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज पहाटे ३.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. भारताने १० मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर १ हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानमधील जैशच्या दहशतवाद्यांचे कंबरडेच एकप्रकारे भारताने मोडले आहे. भारतीय गुपचर यंत्रणेने पुन्हा जैश ए मोहम्मद हि संघटना पुन्हा एका हल्ल्याच्या तयारीत आहे असा इशारा दिला होता. त्यानंतर भारतीय वायुसेनेकडून तात्काळ हि कारवाई करण्यात आली.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानच्या संसदेत विरोधकांनी शेम शेम अशी नारेबाजी केली. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ता मेजर असिफ गफूर यांनी सुरुवातीला एक ट्विट करून या हल्ल्याविषयी माहिती दिली होती.

मेजर गफूर यांनी पाकिस्तानी विमानांनी भारताची विमाने पळवून लावली तर भारतीय विमानांनी मोकळ्या जागेत बॉम्बहल्ला केला अशी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते शेरी रहेमान यांनी म्हंटले आहे सीमारेषेच्या आत येऊन केलेला हा हल्ला खूप कमकुवत राजकारणाचा भाग आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकारने केलेले हे एक षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

तर एका भाजप खासदाराने म्हंटले आहे कि भारताने पाकिस्तानमध्ये घुसून आमची इज्जत लुटली. तर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. त्यांच्या मते रात्री जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते हल्ला करणार होते पण अंधारात किती नुकसान झाले आहे याची कल्पना नव्हती. म्हणून प्रतिहल्ला केला नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *