सर्जिकल स्ट्राईक-२ नंतर बालाकोट येथील स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया..

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरात संतापाची लाट होती. भारताने आज पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. आज पहाटे ३.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली आहे. भारताने १२ मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर १ हजार किलोचे बॉम्ब फेकले आहेत.

या हल्ल्यात जैश चे लाँच पॅड आणि ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करण्यात आले आहेत. बोलले जात आहे कि या हल्ल्यात जैशचे जवळपास ३००-४०० दहशतवादी ठार झाले आहेत.

पण पाकिस्तानी मीडियाच्या मते भारतीय वायुसेनेचे जेट पाकिस्तानमध्ये घुसले आणि पाकिस्तानी वायू सेनेच्या विमानांनी त्यांना पळवून लावले. कोणतीही जीवित हानी या हल्ल्यात झाली नसल्याचे पाकिस्तानी मीडियाचे मत आहे. पण नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो BBC ने बनवला असून यात स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये आदिल नामक एक व्यक्ती या हल्ल्याची माहिती सांगताना दिसत आहे. यामध्ये तो पहाटे झालेल्या हल्ल्याचे कसे आवाज झाले आणि विमानांचे कसे आवाज येत होते हे सांगतो. तो म्हणतो आम्ही रात्रभर झोपलो नाहीत. हल्ला झाला तिथे ५ स्फोट सोबतच झाल्याचे तो बोलतो. तर काही लोक जखमी झाल्याची देखील माहिती आहे.

दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो BBC उर्दुचाच असल्याचा दावा आहे. परंतु BBC ने याला नकार दिला आहे. यामधील व्यक्तीच्या मते भारतीय विमानांचे आवाज, स्फोटाचे आवाज आणि नंतर विमानांचे आवाज येत होते. पण याने जो दावा केला आहे कि भारताचे आणि पाकिस्तानचे विमान हे हवेत कसं कळलं असेल असा प्रश्न पडतो.

बघा BBC उर्दू ने घेतलेल्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया-

ट्विटरवर व्हायरल झालेला दुसरा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *