बालाकोटमध्ये बॉम्बवर्षाव केलेल्या मिराज २००० च्या या आहेत विशेषतः

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळावर जोरदार हल्ला केला. हा हल्ला हवाई दलाने मिराज २००० या विमानाच्या माध्यमातून हल्ला केला आहे. मिराज २००० माध्यमातून १ हजार किलो स्फोटके दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाने टाकली आहेत. या कार्यवाहीत भारतीय विमानानी चांगली कामगिरी केली आहे. तर आपण पाहूया या विमानाची खासियत.

मिराज हे फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीने भारतीय कंपनी HAL च्या माध्यमातून बनवलेलं लढाऊ विमान आहे. मिराज २००० या सुपरसॉनिक विमानाचा वेग ध्वनीच्या अडीच पटीनं जास्त आहे. ताशी कमाल २३३८ किमीचा पल्ला हे विमान गाठू शकतं. एका मिनिटात हे विमान ५६,००० फूट उंची गाठू शकतं.

या विमानाची खासियत हि आहे कि हे विमान एका झेपेत दीड हजार किलोमीटर उंच उडू शकते. तसेच विमान हे हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवे मध्ये हल्ला करायची क्षमता आहे. हवेतून हवेत हल्ला करायची याची खासियत सैन्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. क्षत्रू सैन्याचे विमान आकाशात दिसले तर हे हवेतूनच त्याला उडवू शकते.

हे विमान एकाच वेळी २४ वेगवेगळ्या ठिकाणी नेम धरून हल्ले करू शकते. या विमानात त्रिकोणी आकाराचं मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) आहेत परंतु, त्याला मागच्याबाजुला पंख (टेल विंग्ज) नाहीत. १९८५ भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले नंतर मिराज २००० असं मिराजची सुधारित आवृत्ती भारतीय वायूदलात दाखल झाली.कारगिल युद्धात लढाऊ विमान मिराज २००० ची जोरदार कामगिरी होती.

भारताने अणुबॉम्ब वाहून नेऊन हल्ला करण्याची जवाबदारी मिराज २००० च्या एका ताफ्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अणुहल्ला ज्यावेळी करायचा त्यावेळी मिराज च्या माध्यमातूनच करावा लागेल. एका वेळी हे विमान ६३०० किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतं.

‘लेझर गायडेड बॉम्ब’चा मारा करण्याची विशेष क्षमता मिराज २००० मध्ये आहे भारतीय वायू दालच्या ताफ्यात एक अग्रगण्य आणि विशेष कामगिरी करण्याची क्षमता असलेले लढाऊ विमान म्हणून मिराज २००० ची ओळख आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *