पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या गाडीचा मालक सापडला..

१४ फेब्रुवरीला पुलवामा दहशतवादि हल्ल्याने भारत हादरून निघाला. त्यानंतर तपास यंत्रणा या हल्ल्यामागे असलेल्या सर्वांच्या मुसक्या आवळण्याकरिता आपला तपास जोरात चालू ठेवला आहे. एनआयएला या तपासात मोठे यश मिळाले आहे. या हल्याकरिता वापरण्यात आलेली गाडी ज्यामध्ये आरडीएक्स भरून आणण्यात आले होते त्याचा मालक सापडला होता.

आदिल अहमद डार या आतंकवाद्याने हि गाडी वापरली होती. तो या हल्ल्यात ठार झालेला आहे. या हल्यात वापरण्यात मारुति ईको कार अनंतनाग येथील राहणारा सज्जाद भट याची होती. आपल्याला माहिती आहे कि या आत्मघाती हल्यात भारताचे ४२ वीर जवान शहीद झाले होते. आणि या हल्ल्याची जवाबदारी जैश-ए-मोहम्मद यांनी घेतलेली आहे.

हि गाडी हल्ल्याच्या फक्त १० दिवस अगोदर घेतली होती. एनआयएच्या फोरेन्सिक आटोमोबाइल एक्स्पर्टनि या गाडीचा पूर्ण तपास केलेला आहे. मुळ मालक जलील अहमद हक्कानी यांनी हि गाडी २०११ मध्ये विकत घेतली होती. तेव्हापासून हि गाडी ७ वेळा विकण्यात आली आहे. ४ फेब्रुवरीला म्हणजे हल्याच्या १० दिवस अगोदर हि गाडी सज्जाद भट याने विकत घेतली होती.

सज्जाद अनंतनाग जिल्ह्यातील बिजहबेरा येथील रहिवासी आहे. तो सिराज-उल-उलूम चा देखील विद्यार्थी होता. एनआईएने सांगितले आहे कि सज्जाद जैश ए महमद सोबत जुळालेला होता. हत्यारा सोबत त्याचे अनेक फोटो देखील सापडले आहे. बुर्हाण वाणी ला मारल्यानंतर उसळलेल्या दंग्यात त्याचा मकबूल भट सोबत सहभाग होता.

२३ फेब्रुवरीला त्याच्या घरी छापा मारला परंतु तो सापडला नाही आहे सध्या तो फरार आहे. या हल्याचा मास्टरमाइंड गाजी राशिद याला मागे सेना आणि सीआरपीएफ यांच्या ऑपरेशनमध्ये ठार मारले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *