भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम वाचा खासरेवर..

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर सफोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.

आज भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादि भागात हल्ला चढवून जैशचा अड्डा उध्वस्त केला या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम आपल्याला माहिती नाही आता तो बघूया, या साठी १२ लष्करी मिराज विमान आणि १००० किलोचा बॉंब वापरण्यात आला. असे बोलल्या जात आहे कि जैश ला हल्याची माहिती असल्याने त्यांच्या मुख्य लोकांनी ठिकाण बदलली आहेत.

मंगळवारी सकाळी ३:३० मिनटाने या कार्यवाहीस सुरवात झाली. भारतीय विमाने हे पाकिस्तानच्या हद्दीत घुसली त्यानंतर हि मोठी कार्यवाही झाली. अवघ्या ३ ते ४ मिनटात भारताचे विमान हे पाकिस्तानी सीमेत गेली. विमानाचा वेग सुध्दा तब्बल २३०० किमी प्रती तास एवढा होता. त्यानंतर पाकिस्तानातील जैश चे दहशतवादी केंद्र टार्गेट करण्यात आली.

फक्त ३० ते ४० मिनटात हा हल्ला पूर्ण करून भारतीय विमाने परत आली. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी मारल्या गेले असे अनेक सूत्राकडून कळत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हा पाकिस्तानवर केलेला सर्वात मोठा हल्ला आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे. एनआयए नि हि माहिती दिली आहे.

भारताकडून ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व गोष्टी मुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला आहे. भारताच्या हल्ल्यात काहीही नुकसान झाले नाही अश्या खोट्या बातम्या त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

आपल्याला हि माहिती आवडली तर नक्की लाईक करा व आमचे पेज शेअर करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *