पाकीस्तानात ७ वर्ष गुप्तहेर म्हणून राहीले होते अजित डोभाल यांचे काही खासरे काम

एक असा भारतीय जो खुलेआम पाकीस्तानला मुंबईच्या बदल्यात बलुचिस्तान बळकवु अशी धमकी देणारा आहे. एक असा गुप्तहेर जो ७ वर्ष पाकीस्तान मधील लाहोर मध्ये ६ वर्ष मुसलमान बनुन आपल्या देशाची रक्षा करत होता. ते भारतातील एकमेव नागरीक आरेत ज्यांना शांतीकाळात देण्यात येणारा पुरस्कार किर्ती चक्राने सन्मानित केलेले आहे. इथे आपण बोलत आहोत केरल कैडर १९६८ बॅचचे आयपीएस अजीत डोभाल जे १९७२ मध्ये भारतीय गुप्तहेर एजन्सी आईबी सोबत जुळाले.

मुळ उत्तरांखंड येथील पोडी गढवाल येथील अजीत डोभाल यांचे शिक्षण अजमेर मिल्ट्री स्कुल मध्ये पुर्ण झाले व त्यांनंतर आगरा येथुन अर्थशास्त्र मध्ये त्यांनी एमए चे शिक्षण पुर्ण केले. डोभाल यांनी केलेल्या कामापुढे सिनेमातील जेम्स बॉण्ड देखील फिका पडेल. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. मोठ मोठे मंत्री देखील अजित डोभाल यांना भितात हे सत्य आहे.

भारतीय सेनेद्वारा म्यानमार येथे सर्जिकल स्ट्राईक देऊन दुष्मनांना संदेश दिला का आक्रमक व रक्षात्मक भारत राहील.

१. भारतीय सेनेचे एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन ब्लु स्टार सुरू असताना त्यांनी महत्वाची भुमिका निभावली. तेव्हा ते पाकीस्तान मध्ये होते त्यांनी खलीस्तानी लोकांचा विश्वास संपादन केला व त्यांच्या तयारीची माहीती मिळवली. २. जेव्हा १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्स चे विमान आईसी ८१४ काठमांडू येथुुन अपहरण करण्यात आले. भारताकडून ते मुख्य वार्ताकार होते. त्यानंतर हे विमान कंधार ला नेण्यात आले.

३. कश्मीर मध्ये वाढलेले उग्रवादी कमी करण्याचे काम देखील अजित डोभाल यांनी निभावले. त्यांनी उग्रवाद्यांना शांतिरक्षक बनवले. भारतातील सर्वात मोठा उग्रवादी दल कुका पारेला त्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. ४. ८०च्या दशकात अजित डोभाल उत्तर पुर्व भागात देखील सक्रीय होते. त्यावेळेस ललडेंगा यांच्या नेतृत्वाखाली मिजो नँशनल फ्रंटने हिंसा व अशांती माजवली होती. डोभाल यांनी त्याचे ६ कमांडर आपल्या बाजुने घेतले. यामुळे ललडेंगाला भारत सरकार सोबत शांतिविराम विकल्प निवडावा लागला.

५. डोभाल यांनी १९९१ साली खलिस्तान लिबरेशन फ्रंट द्वारे अपहरण केलेले रोमानीयन राजदुत लिविउ राडु यांना वाचविण्याची योजना त्यांनीच आखली बोती. ६.डोभाल यांनी पुर्वोत्तर भारतात सेनेवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्टाईकची योजना बनवली व म्यानमार मध्ये कार्यवाही करुन ३० उग्रवादी मारले होते. ७. डोभाल यांनी पाकीस्तान व ब्रिटन मध्ये अनेक राजकीय जवाबदार्या पुर्ण केल्या आहेत. त्यानंतर आयबी मध्ये १० वर्ष सतत ऑपरेशन शाखा चालवली.

आपल्याला ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *