वाचा पाकिस्तानवरील एअरस्ट्राईकचा म्हणून व्हायरल झालेल्या या व्हिडीओचं सत्य..

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती.

आज भारताने निंयत्रण रेषा ओलांडून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलाने जैशच्या अड्ड्यांवर आज मोठा हल्ला केला. पहाटे ३.३० वाजता पाकिस्तानमधील बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. १ हजार किलोंचा बॉम्बवर्षाव यावेळी करण्यात आला. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे.

या हवाईहल्ल्यात ३५० दहशतवादी ठार झाले असल्याचा अंदाज आहे. यामध्ये ३२५ अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे २५ प्रशिक्षक अशा एकूण ३५० जणांचा खात्मा करण्यात आला आहे.

या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहर, भाऊ इब्राहिम अहमदसह हिटलिस्टवर असलेले महत्वाचे दहशतवादी ठार झाले आहेत. यात प्रामुख्याने मौलाना उमर, मुफ्ती अजहर खान या अतिरेक्यांचा समावेश आहे.

या हल्ल्याचा एक व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये भारताने आज केलेला बॉम्बवर्षाव असल्याचे बोलले जात होते. पण हा व्हायरल झालेला व्हिडीओ आजचा नसल्याचे समोर आले आहे. आज सर्वत्र तो व्हिडीओ एअरस्ट्राईकचा असल्याचे दाखवण्यात आले होते. पण आता या व्हिडीओची सत्यता समोर आली आहे.

हा व्हिडीओ खासकरून पाकिस्तानी यूजर्सनी शेअर केल्यामुळे चांगलाच व्हायरल झाला होता. या हल्ल्याचे पाकिस्तानकडून आलेले फोटो वगळता अजून कुठलेही व्हिडीओ बाहेर आलेले नाहीयेत.

आदिल नामक एका व्यक्तीने हा व्हिडीओ २४ तारखेला ट्विट केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘काल रात्री २ वाजता फोर्ट अब्बास जवळ F-१६ ने केलेले स्फोट’

बघा आदिल चे २४ तारखेचे ट्विट-

म्हणजेच आज व्हायरल झालेला हा व्हिडीओ जुनाच असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- सर्जिकल स्ट्राईक-२ नंतर बालाकोट येथील स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ..
बघा ‘चून चून के मारा’ म्हणून वायरल झालेला व्हिडीओ आणि त्यामागचं सत्य..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *