भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केला हवाई हल्ला, जैशचे अड्डे उध्वस्त! एवढे दहशतवादीही यमसदनी..

१४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर सफोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यामुळे झालेल्या स्फोटात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण भारतातून संतापाची लाट उसळली होती.

भारताने पुलवामा येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. आज पहाटे ३.३० वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. भारताने १० मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर १ हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे.

नुकतेच भारताने सीमेवर सैन्यबळ वाढवले होते. यावरून काही तरी हालचाली चालू आहेत अशी शक्यता वाटत होती. आज भारताने पहाटेच हा हवाई हल्ला करून पाकिस्तानला मोठी अद्दल घडवली आहे.

दहशतवाद्यांनी देखील खबरदारी घेतल्याची चर्चा सर्वत्र होती. अनेक तळ हलवल्याची चर्चा होती. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात जैशची कंट्रोल रुम जमीनदोस्त झाली आहे. दरम्यान पाकिस्तानी सेनेने भारतावर उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली असल्याचा दावा पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरुन केला आहे.

या हल्ल्याचे फोटो पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट केले आहेत. या हल्ल्यात जवळपास २००-३०० दहशतवादी यमसदनी पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. भारताने आतापर्यंत घेतलेला सर्वात मोठा बदला असल्याचे बोलले जात आहे.

ट्विटरवर AirStrike नावाने ट्रेंड देखील या नंतर चालू झाला आहे. या हल्ल्याचा एक व्हीडिओ देखील पाकिस्तानच्या युजर्सकडून शेअर केला जात आहे.माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *