कधी विचार केलाय का, कुत्रे रात्री का रडतात..

जुन्या हॉरर चित्रपटात कुत्र्याचा आवाजाचा सीन हा कॉमन असायचा. रात्री कुत्राच्या आवाज आणि त्या नंतर येणारा भूत किंवा एखादा मोठा बंगला त्यामध्ये हिरो किंवा हिरोईनच्या मागे भूत लागलेलं. अश्या अनेक गोष्टी आहे परंतु हा आवाज रात्री ऐकला कि चांगले चांगले टरकतात परंतु तुम्ही कधी विचार केला का कुत्रे रात्री का रडतात,

आपल्या इकडे गावाकडे सांगितल्या जाते कि कुत्र्यांना रात्रीच्या वेळेस आत्मा दिसतात त्यामुळे ते रडतात किंवा काहीतरी अशुभ होणार आहे किंवा कोणाचा तरी जीव जाणार आहे अश्या अनेक गोष्टी गावाकडे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कुत्र्याचे रडणे अनेक लोक अशुभ मानतात आणि कुत्रे रडायला लागले कि त्यांना हाकलून लावतात.

परंतु अनेक लोकांनी संशोधन केले तर त्यांच्या हे लक्षात आले कि जर कुत्रे उपाशी असेल त्यांना भूक लागली असेल तर ते रात्री रडतात. जर कुत्रे पाळीव असेल तर त्याला एकटेपणा जाणवतो त्याला मालकाची आठवण येत असल्याने तो रडतो असे सांगितले जाते. तसेच कुत्र्यांना देखील बिमारी होतात किंवा त्याचं काही दुखत असेल तर

रात्री कुत्रे त्यामुळे रडतात. कुत्र्यांना देखील जीव असतो त्यांना देखील जखमा होतात किंवा काही शरीरात बदल घडतात त्यामुळे ते रात्री या होणाऱ्या त्रासामुळे रडतात. त्यामुळे अंधश्रद्धा बाळगू नये आणि आपला पाळीव कुत्रा रात्री रडत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवा कदाचित तो बिमार पण असू शकतो. कुत्र्यांना एकमेका सोबत संपर्क करायचा असेल तर ते अश्या प्रकारे आवाज देऊन एकमेकांना बोलवतात हे देखील संशोधनात पुढे आलेले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या वेबसाईटवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *