या एका छोट्या गोष्टीमुळे धोनीला ट्रोल करणे तुम्हाला पटतंय का? वाचा आणि ठरवा..

गेल्या वर्षाभरापासून महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर टीका चालू होती. यातूनच त्याने विश्वचषकात खेळावे की नाही, याबद्दल देखील बरीच झाली. पण यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये धोनीने नेत्रदीपक कामगिरी केली होती आणि आपल्या टीकाकारांना फटकारले होते.

धोनीने न्यूझीलंड दौऱ्यामध्ये तर मालिकावीर हा ‘किताब देखील पटकावला. पण रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात धोनीच्या खेळीवरून आता त्याला पुन्हा एकदा काही जण ट्रोल करायला लागले आहेत. कारण या सामन्यात एम एस धोनीच्या नावावर एक नकोसा असलेला विक्रम झाला आहे.

कालच्या सामन्यात भारताला लोकेश राहुलच्या खेळीच्या जीवावर १० षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारता आली. पण लोकेश राहुल आणि विराट कोहली आऊट झाल्याने भारताची स्थिती ३ बाद ८० अशी झाली. त्यानंतरही भारत मोठी धावसंख्या उभारेल अशी अशा होती. कारण भारताकडे धोनीसह अनेक फलंदाज होते.

धोनी जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा भारताची १० षटकांत ३ बाद ८० अशी स्थिती होती. पण पुढील उर्वरीत १० षटकांमध्ये भारताने केवळ ४६ धावा केल्या. त्यामुळे भारताचा संघ १२७ वर आटोपला. शेवटच्या दहा षटकात झालेली संथ खेळी पराभवाचे कारण ठरल्याचे म्हणत नेटिझन्स धोनीला ट्रोल करत आहेत.

महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात ३ चेंडूंमध्ये प्रत्येकी एक चौकार आणि षटकारासह २९ धावा केल्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये जास्त चेंडू खेळून कमी धावा करण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर होता. जडेजाने ३५ चेंडूंत एका चौकारासह २५ धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनी जडेजपेक्षा दोन चेंडू जास्त खेळला. याेळी धोनीचा ७८.३७ असा स्ट्राइक रेट होता. पण पुढील सामन्यांमध्ये धोनी पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना उत्तर देईल अशी आशा आहे.

ऑस्ट्रेलियाची १-० आघाडी-

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. भारताने दिलेल्या १२७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलपर्यंत वाट बघावी लागली. ग्लेन मॅक्सवेल (५६) आणि डी अॅर्सी शॉर्ट (३७) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

एवढे माफक आव्हान असतानाही भारताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत सामन्यावर पकड मिळवून दिली होती. १८ व्या आणि १९ व्या षटकातील अचूक गोलंदाजीने सामना भारताच्या बाजूने झुकला होता. पण शेवटच्या षटकात उमेश यादवने १४ धावा दिल्याने भारताचा पराभव झाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *