अन अशाप्रकारे पुन्हा एकदा धोनीची डोकॅलिटी खरी असल्याचे सिद्ध झाले!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामना काल विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक विजय मिळवला. सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. भारताने दिलेल्या १२७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला शेवटच्या बॉलपर्यंत वाट बघावी लागली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवला. पुनरागमन करणारा सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला लक्षणीय कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ १२७ धावांचे आव्हान ठेवले होते.

एवढे माफक आव्हान असतानाही भारताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत सामन्यावर पकड मिळवून दिली होती. १८ व्या आणि १९ व्या षटकातील अचूक गोलंदाजीने सामना भारताच्या बाजूने झुकला होता. पण शेवटच्या षटकात उमेश यादवने १४ धावा दिल्याने भारताचा पराभव झाला.

धोनीची डोकॅलिटी खरी ठरली-

कालच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जवळपास चमत्कार केलाच होता. पण शेवटचे षटक महागात पडले. भारताने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के दिले. यातील दुसऱ्या विकेटमध्ये धोनीने धोनी रिव्हिव्ह सिस्टीम पुन्हा एकदा सिद्ध केली. दुसरी विकेट हि एरॉन फिंचची होती. बुमराचा बॉल फिंचच्या पॅडवर येऊन आदळला आणि त्याने केलेल्या अपिलला अंपायरने स्वीकारत फिंचला आउट ठरवले.

पण फिंचने यानंतर रिव्हिव्ह घेतला. पण त्यामध्ये देखील त्याला आऊट घोषित करण्यात आले. पण खरं बघायला गेलं तर हा बॉल फक्त स्टॅम्पला चाटून जात होता. अंपायर कॉल ने फिंच बाद ठरला. जर अंपायरने त्याला नॉट आऊट दिलेले असते आणि हाच रिव्हिव्ह भारताने घेतला असता तर तो नॉट आऊटच राहिला असता.

म्हणजेच इथे सिद्ध होते कि DRS हे पूर्णपणे अंपायरच्या निर्णयावर अवलंबून आहे. याबद्दल धोनीने अगोदरच आपले म्हणणे मांडलेले आहे. त्याच्या मते DRS चा निर्णय हा पूर्णपणे अंपायरच्या मतावर अवलंबून आहे. संघाना याचा फायदा असला तरी तो अंपायर काय निर्णय घेतो यावरच अवलंबून आहे.

यापूर्वी देखील अम्पायर्स कॉलवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. अनेकांच्या मते जर बॉल स्टॅम्प ला लागत असेल तर आउटच द्यायला हवे. पण असे न करता अंपायर कॉलवर निर्णय ठरवला जातो. धोनी हा डीआरएसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या लिस्टमध्ये सामील आहे. धोनी नेहमीच DRS हे १०० सक्षम नसल्याचे म्हणणे मांडले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *