युट्यूबवर ६०० कोटी व्ह्यूव्ज मिळवणारं पहिलं गाणं तुम्ही बघितलं का?

‘डेस्पसितो’ या गाण्याने युट्यूबवरचा ६ अब्ज (६०० कोटी) व्ह्यूव्ज काऊंटचा टप्पा पार करून विश्वविक्रम केला आहे. ६ अब्ज व्ह्यूव्ज हा आजवरचा युट्युबवरचा उच्चांक आहे. जून २०१७ ला रिलीज झालेल्या या गाण्याने २ वर्षातच या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

जवळपास पृथीवर असलेल्या लोकसंख्ये एवढे व्ह्यूव्ज या गाण्याने मिळवले आहेत. ‘डेस्पसितो’ नंतर एड शिरनच्या ‘शेप ऑफ यू’ या गाण्याचा दुसरा नंबर लागतो. या गाण्याचे देखील नुकतेच ४ अब्ज व्ह्यूव्ज पूर्ण झाले आहेत. तर जस्टीन बिबरच्या ‘सॉरी’ ला तीन अब्ज व्ह्यूव्ज सह तिसरे स्थान आहे.

यापूर्वी २०१२ मध्ये रिलीज झालेल्या साई (PSY) च्या ‘Gangnam Style’ गाण्याने धुमाकूळ घातला होता. जगभरातील लोक या गाण्याचे दिवाने झाले होते. या गाण्याचा अर्थ समजू नाही समजू पण संपूर्ण जग या गाण्यावर थिरकले. या गाण्याला रेकॉर्ड व्ह्यूव्ज मिळाले होते. त्यानंतर अनेक गाणे आले जे लोकांच्या पसंतीस उतरले.

‘डेस्पसितो’ हे एक स्पॅनिश गाणे असून हे गाणं प्युर्तो रिकोचे प्रसिद्ध रॅपर डैडी यैंकी आणि पॉप स्टार लुई फोंसी यांनी गायले आहे. या गाण्यातील २ प्रसिद्ध शब्द आहेत ‘डेस्पसितो’ आणि ‘पसितो ए पसितो’. यातील ‘डेस्पसितो’चा अर्थ हळू हळू तर ‘पसितो ए पसितो’चा अर्थ स्टेप बाय स्टेप होतो.

बघा हे सर्वात जास्त व्ह्यूव्ज असलेलं गाणं-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- बघा शहीद सुखविंदर यांनी हल्ल्यापूर्वी रेकॉर्ड केलेला बसमधील व्हिडीओ..
वाचा सोशल मीडियाला आपल्या अदांनी घायाळ करणारे शेवंता अन अण्णा नेमके आहेत तरी कोण?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *