टिक टॉकचा तो व्हिडीओ ठरला त्याच्या आयुष्याचा शेवटचा व्हिडीओ..

कधी कशाचे वेड तरुणाई मध्ये लागेल याचा भरोसा नाही आता फेसबुक इंस्टाग्राम कमी होते कि काय त्यात आता टिकटॉक चे वेड तरुणाई ला लागले आहे. अनेकजण टिकटॉक वर व्हिडीओ बनवतात आणि टाकतात. व्हिडीओ पोस्ट करायच्या नादात कधी कधी ते आपल्या जीविताला व इतरांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण करतात. आता एक व्हिडीओ समोर आला आहे तो व्हिडीओ आपण पाहून टिकटॉक चे व्हिडीओ बनवताना नक्कीच विचार कराल.

एक तामिळनाडू येथील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तीन विद्यार्थी एका स्कुटीवर बसून चालले आहेत. ते गप्पा मारत आहेत आणि त्याच सोबत टिकटॉक साठी व्हिडीओ सुद्धा बनवत आहेत. मध्ये मध्ये त्यांच्या स्कुटीचे बॅलन्स बिगडताना दिसतंय पण त्यांना काही फरक पडत नाहीत. ते तसेच बाईक वर जाताना दिसत आहेत. थोड्या वेळाने एका गाडीला ओव्हरटेक करून ते जातात .. त्यांचा टिकटॉकसाठी साठी व्हिडीओ बनवणे सुरूच असते. थोड्यावेळाने त्यांची गाडी जाऊन बसला पाठी मागून धडक देते.

यात तिन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झालेत त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले पण त्यात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे तामिळनाडू येथे टिकटॉक बद्दल विधानसभेत सुद्धा मुद्दा घेण्यात आला कि टिकटॉक वर निर्बंध आणावेत कारण आपला जीव धोक्यात घालून काहीजण व्हिडीओ बनवत आहेत.

मित्रानो आपण टिकटॉक वापरू नये अशी भूमिका नाही पण आभासी जगापेक्षा रियल जग महत्वाचे आहे. सोशल मिडीया वर लाईक कॉमेंट कमी आल्या म्हणून आपण अधिक लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करू नका. समोरील व्हिडीओ पाहून आपण नक्कीच टिकटॉकवर व्हिडीओ बनवताना विचार कराल

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *