माझ्या अंगाऱ्याने प्रमोद महाजन 12 दिवस जिवंत होते ! मोठ्या नेत्याने केला खळबळजनक दावा..

अंबेजोगाई ते दिल्ली हा प्रवास इतका सोपा नाहीये आणि नव्हता, पण स्वकर्तुत्वाने ह्या माणसाने देशांच्या राजकारणात भावी पंतप्रधान म्हणून नाव कमावले होते. हे नाव होते प्रमोद महाजन यांचे,

डावा हात वर करून भाषण करायची त्यांची लकब वेगळीच होती. नुसती विरोधकांवर टीका करणारी भाषणे न करता, विरोधकांच्या मर्मावर घाला घालणारी आणि लोकांना सोप्या भाषेत स्वतःचे म्हणणे पटवून देणारी भाषणे देणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन हे आहे. महाराष्ट्रातील सेना भाजप युतीचे ते शिल्पकार होते. भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते तर प्रमोद्जीना भावी पंतप्रधान ह्या स्वरुपात पाहत असत.

प्रमोद महाजन यांच्यावर त्यांच्या भावाने गोळीबार केला. आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला परंतु औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक अजब दावा केला आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नाडीवर हात ठेवून मी त्यांना वाचवलं असतं, असा दावा चंद्रकांत खैरेंनी केलाय. गोळीबारानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रमोद महाजन अत्यवस्थ होते तेव्हा मला त्यांच्यापर्यंत पोहचू दिलं नाही. पोहचू दिलं असतं तर नाडीवर हात ठेवून जप करून त्यांना वाचवलं असतं.

प्रमोदजी जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा मला गोपीनाथ मुंडे म्हटले होते तू काहीतरी कर. सिद्धिविनायक मंदिरात जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये. माझ्याकडे एक पुडी होती. तो अंबाबाईचा अंगारा होता, तो मी राहुलकडे दिला. राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव. प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो होतो मी जप केला.

पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही. तिथे जाण्याची कुणाला संमतीच नव्हती. ती मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो असा दावा खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी बारा दिवस जगले, त्यानंतर शांत झाले. त्याच एका कामात मला अपयश आलं नाहीतर मला आत्तापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलेलं नाही. जशी डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते. मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही खरोखरच सांगतो आहे असंही खैरे यांनी सांगतिलं

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या पत्त्यावर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *