पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर विभूतींच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का? कॉलेजपासून होते दोघांचे प्रेम..

पुलवामा दहशतवादी हल्या झाल्यानंतर १८ फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले त्यापैकी शहीद विभूति शंकर ढौंडियाल हे देहरादून येथील निवासी होते. काही दिवसा अगोदर सोशल मिडीयावर त्यांची पत्नी निकीता व त्यांची लव स्टोरी वायरल झाली होती. मेजर विभूती हे ५५ राष्ट्रीय रायफल मध्ये कार्यरत होते.

मेजर विभूतीचे वडील देखील सैन्यात डिफेन्स अकाऊट ऑफिस मध्ये होते. त्याच्या घरात पत्नी , आई आणि आजी असा त्यांचा परिवार आहे. मागील वर्षी एप्रिल मध्ये दोघांचे लग्न झाले होते. पुलवामा हल्यातील दहशतवाद्यांना त्या दिवशी कंठस्नान घालण्यात आले. मास्टर माइंड गाजी रशीदला देखील मारण्यात आले.

सध्या मेजर विभूती व निकिता दोघांचा लग्नाचा डान्स वायरल झालेला आहे. मेजर विभुती व निकीता दोघे कॉलेजपासून मित्र होते. निकीताने पंजाब विद्यापीठात एमबीएचे शिक्षण पुर्ण केले आहे. निकीता स्वतः नवर्या प्रमाणे शुर आहे. याचा परीचय तिने अंत्यविधी सुरू असताना दिली आहे. निकीताने अंत्यविधी सुरू असताना ति त्याच्यावर किती प्रेम करते हे सर्वाना सांगितले.

सध्या निकीता टिसीएस कंपनीत कार्यरत आहे. दोघांचे लग्न १० महिन्या पुर्वीच झाले होते. त्यामुळे अनेकांच्या ह्रद्ययास या घटनेने पाझर फोडला होता. त्यांच्या लग्नातील डान्सचा व्हिडिओ सद्या वायरल झाला आहे. दोघेही रोमॅन्टिक गाण्यावर नाचताना दिसत आहे.

खाली दिलेल्या लिंकवर आपण हा व्हिडीओ बघू शकता..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *