पुलवामा हल्ल्यापूर्वीच्या बसच्या आतील दृश्यांचा काळीज चीरणारा व्हिडीओ समोर, बघा व्हिडीओ..

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात ४० जवान शहीद झाले. पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला होता. जैश ए मोहम्मद या संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्याविषयी रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत.

या हल्ल्यात शहीद झालेले पंजाबमधील जवान सुखविंदर सिंग यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी हल्ला होण्यापूर्वी हा व्हिडीओ आपल्या पत्नीनं पाठवला होता. बसमध्ये सर्व जवान बसलेले दिसत आहेत. सुखविंदर हे बसमधील आणि बाहेर दृश्य रेकॉर्ड करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यांनी पत्नीला व्हाट्सअप ला पाठवला. पण त्यांच्या पत्नीने तो बघण्याआधीच त्यांना हल्ल्याची माहिती समजली.

सुखविंदर सिंग पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावाचे रहिवासी होते. नुकतेच घरी ते सुट्टीवर आले होते आणि आपल्या परिवारासोबत काही काळ थांबून परत ड्युटीवर गेले होते. सुखविंदर सिंग यांना ८ महिन्याचा मुलगा होता त्यामुळे या वेळेस जाताना त्यांचे मन काही लागत नव्हते. अचानकच येऊन ते बाळाला जवळ घ्यायचे आणि त्याचे लाड करायचे.

एक महिन्याच्या सुट्टीनंतर ते २८ जानेवारी रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झाले होते. सुखविंदर सिंग हे आपला भाऊ गुरजंट सिंग जंटा यांच्या सोबत नेहमी संपर्कात असे. हल्याची दिवशी सुध्दा त्याने सकाळी १०:३० च्या सुमारास आपल्या भावाला संपर्क केला आणि तो घरातील सर्वाची माहिती विचारत होता. जम्मू मधील समस्या ते आपल्या भावाला सांगत होते.

‘जम्मू काश्मीरमधील रस्ते काही दिवस बंद असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुरुस्तीनंतर येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.’ असे ते भावाला बोलले आणि नंतर अचानकच काय त्याच्या मनात आले आणि त्याने विचारले माझा मुलगा रडत तर नाहीय ना?, तो ठीक आहे ना? पुढे सांगितले कि या वेळेस परत येताना भरपूर खेळणे घेऊन येणार आहे. पण त्यानंतर थोड्याच वेळात ते शहीद झाल्याची बातमी कुटुंबाला कळाली.

बघा शहीद सुखविंदर यांनी हल्ल्यापूर्वी रेकॉर्ड केलेला बसमधील व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *