सोशल मीडियाला आपल्या अदांनी घायाळ करणारे शेवंता अन अण्णा नेमके आहेत तरी कोण?

सध्या महाराष्ट्रात झी मराठी वरील सिरीयल रात्रीस खेळ चाले हि प्रचंड चालत आहे. या सिरीयल मधील अण्णा आणि शेवंता या पात्रांना लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अण्णा व शेवंता यांच्या मेमे जोक्स आणि पोस्ट चा सुळसुळाट झाला आहे. तर आज आपण पाहूया रात्रीस खेळ चाले या मालिकेतील पात्र अण्णा व शेवंता यांच्याबद्दल.

रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या सीझनमध्ये अण्णांची भूमिका ज्या कलाकारांनी साकारली होती. तेच कलाकार दुसऱ्या सिझन मध्ये देखील अण्णा ची भूमिका साकारत आहेत.त्यांचे नाव आहे माधव अभ्यंकर त्यांनी रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णाची जी भूमिका साकारली त्यात त्यांनी स्वतःला अत्यंत क्रूर निर्दयी लहान मुलांना मारणारे अशी दाखवली आहे. त्यांच्या भाषेतून आपल्याला ते मालवणी आहेत असे वाटत असेल पण माधव अभ्यंकर हे मूळचे पुण्यातील आहेत आणि प्रथमच ते मालवणी भाषेत बोलत आहेत.

त्यांची भूमिकेसाठी घेतलेली मेहनत यातून दिसेल. त्यांनी सिरीयल मध्ये मालवणी बोलावी लागणार यासाठी ती शिकण्यासाठी मालवणी नाटके पाहत भाषा शिकली त्यासाठी त्यांना अभिनेता लीलाधर कांबळी यांनी मदत केली. रात्रीस खेळ चाले या सिरीयल करीता त्यांनी ७ ते ८ किलो वजन हि कमी केले.त्याच मुळे पात्रात जिवंतपणा येऊन प्रेक्षकाला पसंतीस उतरले आहे.

आता या मालिकेत जे दुसरे पात्र आहे ज्याची सर्वजण चर्चा करतात .ते म्हणजे शेवंता. आता ही शेवंता आहे तरी कोण? गेल्या सिझन मध्ये जी सुशल्या होती तिची आई.. तिची भूमिका साकारलीय अपूर्वा नेवळेकरनं. मालिकेत शेवंताची भूमिका हि सुंदर व मादक अशी दाखवली आहे. अपूर्वा हि मूळची मुंबई येथील तिने BAMS ची डिग्री घेऊन काही काळ बँक मध्ये नोकरी केली.

त्यानंतर तिने अपूर्वा कलेक्शन नावाने हॅण्डमेड ज्वेलरी चा व्यवसाय केला. झी मराठी वरील आभास हा या मालिकेतून प्रथमच अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते त्यानंतर तिने काही मराठी चित्रपट हि केले आणि आता शेवंता च्या भूमिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. शेवंताच्या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्बल ७ ते ८ किलो वजन तिने वाढवले आहे. भूमिकेला अनुरुप दिसण्यासाठी तिची प्रचंड मेहनत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *