“छत्रपती शिवाजी महाराजां” चे विश्वासू “सरसेनापती हंबीरराव मोहिते” लवकरच रुपेरी पडद्यावर..

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीप मोहिते पाटील हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे असणार आहे. प्रवीण तरडे यांचा नुकताच काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता.

चित्रपटाची घोषणा करताना तरडे म्हणाले, ‘ हंबीरराव मोहिते यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत केले. हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जून ला होईल.’ हा चित्रपट जानेवारी 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असेही तरडे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या दोन्ही गोष्टी रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *