डिजिटल भिकारी: ऑनलाईन भिक मागून कमावतो एवढे लाख रुपये..

इंटरनेट मुळे बेकारी वाढली असे अनेक लोक बोलतात आता त्यामध्ये भर पडली जिओची सुरवातीला फुकटात इंटरनेट देऊन अनेक तरुणी tiktok, facebook अश्या अनेक सोशल मिडिया साईटच्या आहारी गेले आहेत. परंतु असा युवक दाखविला जो इंटरनेट वर भिक मागून कमावतो लाखो रुपये तर तुम्हाला खरे वाटेल का ? आणि लोक इंटरनेट वापरणाऱ्याला भिक कशाला देणार ? बघूया कोण आहे हा तरूण आणि कश्या प्रकारे मागतो भिक

हा २५ वर्षीय युवक न्यूयॉर्क येथील रहिवासी आहे आणि नुकताच तो डिजिटल भिकारी म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे. आणि विशेष हे आहे कि अनेक लोक त्याला मोठ्या मनाने दान सुध्दा करत आहे आणि त्याची महिन्याची कमाई आपल्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा नक्की जास्त आहे. २५ वर्षीय जोवन हिल सोशल मीडिया प्लेटफॉर्मचा वापर भिक मागण्या करिता करतो.

विशेष म्हणजे हा महाभाग या पैश्यातून असे आयुष्य जगतो जे त्यांना दान करतात त्यांना देखील असे आयुष्य जगता येत नाही. जोवन हा जुना भिकारी नसून नुकताच त्याने हा व्यवसाय सुरु केलेला आहे. पहिले तो एका हॉटेल मध्ये कामाला होता तिथे त्याला ९६५ पौंड म्हणजे जवळपास ८७ हजार एवढा पगार मिळत होता सोबतच तो घरोघरी जाऊन हेल्थ केअरक सर्विस देण्याचे काम सुध्दा करत होता.

जोवन आयुष्य याच भिकेवर चालत आहे. ज्यामुळे तो आपल्या खोलीचे भाडे इतर खर्च तो उचलत आहे. जोवन सांगतो कि कोणी त्याला १ डॉलर तर कोणी १०० डॉलर देखील भिकात देतो. जोवन ला Periscope, Twitter, YouTube, Instagram and Patreon वर २ लाखापेक्षा अधिक फोलोवर आहेत. त्याला महिन्याला तब्बल ४ हजार डॉलर म्हणजे जवळपास ३ लाख रुपये त्याच्या फोलोवर कडून मिळत आहे.

तो भिक मागण्या करिता लाइव स्ट्रीम करतो आणि आपल्या आयुष्यातील समस्या तो आपल्या व्हिडीओ मध्ये सांगतो लोकांना त्याने केलेल्या स्ट्रीम आवडतात आणि त्याला लोक ऑनलाइन दान करतात आणि त्याचे आयुष्य तो मजेत जगत आहे.

आपल्याला हि त्याची भन्नाट आयडिया आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपण माहिती आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *