धोनी तो धोनीच आहे! बांग्लादेशच्या खेळाडूला शिकवलेला हा धडा सोशल मीडियावर व्हायरल..

नुकतेच झालेल्या २ सिरीजमध्ये धोनी थकलाय अशी टीका धोनीवर चालू झाली होती. एका सामन्यातील त्याच्या संथ खेळीमुळे तर त्याच्यावर जास्तच टीकेची झोड उठली होती. पण त्यानंतर खेळलेल्या एकापेक्षा एक जबरदस्त मॅच विनिंग पारीमुळे त्याने टीकाकारांचे तोंड बंद केले होते. धोनीने आपण आजही मॅच फिनिशर असल्याचे मागच्या सामन्यात दाखवून दिले होते.

धोनी या शिवाय त्याच्या मैदानातील डावपेचांसाठी देखील सर्वाना माहिती आहे. पण खेळाडू फॉर्ममध्ये नसल्यावर डावपेच फसत असतात. सामन्यात कोणता प्लेयर काय करेल हे धोनी बरोबर हरतो. धोनी सध्या कर्णधार नसला तरी तो कर्णधार असल्यासारखं काही निर्णय मैदानात घेत असतो. आणि खेळाडूंना मार्गदर्शन करतो.

एवढेच नाही तर तो इतरही वेगवेगळ्या युक्त्या वापरून विरोधी संघातील फलंदाजांना घायाळ करून टाकतो. नुकत्याच न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सिरीजमध्ये तर धोनी महाराष्ट्राचा खेळाडू असलेल्या केदार जाधवसोबत मराठीत बोलला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हा किस्सा चांगलाच व्हायरल झाला होता.

पण सध्या सोशल मीडियावर असाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात धोनीचे वेगळे रूप बघायला मिळते. हे रूप म्हणजे जशास तसे उत्तर देणारा आणि बदल घेऊन धडा शिकवणारा धोनी होय.

हा किस्सा आहे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या एका सामन्याचा. यामध्ये धोनी आणि रोहित शर्मा फलंदाजी करत आहेत. बांग्लादेश चा गोलंदाज मुश्तफिझूर रहेमान त्याच्या ओव्हरमध्ये मुद्दामहून धाव घेताना रोहित शर्माच्या मध्ये अडथळा आणतो. त्याला रोहित शर्मा एकदा वॉर्न देखील करतो. पण तो काही ऐकत नाही. त्यानंतर धोनीसोबतही तो तेच करतो. पण धोनी त्याला असा काही धडा शिकवतो कि तो बघतच राहतो.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

अधिक वाचा- बघा शहीद सुखविंदर यांनी हल्ल्यापूर्वी रेकॉर्ड केलेला बसमधील व्हिडीओ..
अधिक वाचा- वाचा सोशल मीडियाला आपल्या अदांनी घायाळ करणारे शेवंता अन अण्णा नेमके आहेत तरी कोण?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *