सैनिक डॉक्टर असून बनले डाकू… जाणून घ्या भारतातील १० सुशिक्षित दरोडेखोरांबद्दल ..

मध्यप्रदेशातील चम्बळ शिवपुरी मरैना चित्रकूट रिवा इत्यादी भागात दरोडेखोरांचा वावर राहत आला आहे. तेव्हापासून आज पर्यंत दरोडेखोरांची दहशत या भागात आहे.अनेक दरोडेखोर स्वतःला बागी म्हणजे क्रांतिकारी समजतात. सुरुवातीला हे दरोडेखोर फक्त दरोडे टाकायचे नंतर त्यांनी आपल्या भागातील जमिनींचे तंटे या गोष्टीत लक्ष घालणे सुरु केले.पुढे दरोड्या सोबत अपहरण हि करायचे. या दरोडेखोरात काही प्रसिद्ध नावे आहेत. त्यापैकी १० प्रसिद्ध दरोडेखोरांबद्दल जाणून घेऊया.

१) मलखान सिंह – आता हा दरोडेखोर पाकिस्तान सोबत आम्ही लढतो आम्हाला शस्त्र द्या हि मागणी करून देशात प्रसिद्ध झाला आहे. पण तो सुरुवातीपासून प्रसिद्ध आहे. आपल्या गावातील सरपंचाविरुद्ध त्यांनी तक्रार केलेली कि सरपंचाने गावातील मंदिराची जागा स्वतः बळकावली. तर सरपंचाने चुकीच्या गुन्ह्यात मलखान सिंह याला गुंतवून जेल मध्ये पाठवले व त्याच्या मित्राची हत्या केली. यामुळे मलखान सिंह याने स्वतःला बागी घोषित करून हातात रायफल घेऊन सरपंचाची हत्या केली.नंतर छोट्या मोठ्या अनेक गोष्टी केल्या. अनेक दरोडे खून त्याच्या नावावर आहेत. शेवटी त्याने स्वतःला सरेंडर करून घेतले

२) पान सिंह तोमर – हा प्रसिद्ध दरोडेखोर आहे. या दरोडेखोराच्या जीवनावर एक हिंदी चित्रपट सुद्धा आला होता. पान सिंह हा सैन्यात नोकरीला होता.तसेच सैन्यात असताना तो राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार मिळवलेला धावपट्टू होता. जमिनीच्या वादातून आपल्या नातेवाईक बाबू सिंह याची त्याने हत्या केली आणि स्वतःला बागी घोषित करून तो दरोडे टाकायचा. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत १० साथीदारांसह त्याचा मृत्यू झाला.

३) फुलन देवी – फुलन देवी ला डाकू बनण्यासाठी समाजच जबाबदार आहे. तिच्यावर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी फुलन देवी डाकू बनली. ज्या २२ लोकांनी फुलन देवी वर बलात्कार केला होता त्यांना एका लाईन मध्ये उभे करून त्यांची तिने हत्या केली. १९८३ साली तिने सरेंडर करून नंतरच्या काळात राजकारणात येऊन दोन वेळा खासदार झाली २००१ साली दिल्लीत तिची गोळी झाडून हत्या केली.

४) मान सिंह – १९३५ ते १९५५ पर्यंत त्याने १११२ एवढे दरोडे टाकले तर १८२ हत्या केल्या. त्याच्यात ३२ पोलीस सुद्धा होते. संपूर्ण भागात मान सिंह ची दहशत होती त्याच मुळे शेवटी मिलिटरी त्याच्या पाठी मागे लागली व १९५५ साली त्याची व मुलगा सुभेदार सिंह याची चकमकीत हत्या सैन्यांनी केली.

५)शिव कुमार पटेल उर्फ ददुआ – हा वयाच्या २२ व्या वर्षी दरोडेखोर बनला त्याने एका व्यक्तीची हत्या केली व नंतर आपली टोळी बनवली आणि अनेक दरोडे टाकले. त्याच्या नावावर अनेक हत्या आहेत. पोलिसांचा हेर म्हणून त्याने काही लोकांची हत्या केलेली. २००७ साली पोलिसांच्या चकमकीत तो आपल्या टोळी सहित मृत्युमुखी पडला.

६) माथो सिंह – चंबळच्या खोऱ्यात आतंक चे दुसरे नाव म्हणून माथो सिंह चे नाव ओळखले जाते.1960-70 या दशकात २३ खून ५०० हुन अधिक दरोडे त्याच्या नावावर आहेत. श्रीमंतांना लुटून गरिबांना वाटायचे काम तो करायचा. त्याच्या टोळीत ५०० साथीदार होते. जयप्रकाश नारायण यांच्या समोर आपल्या साथीदारांसह सरेंडर झाला.

७) सीमा परिहार – वयाच्या १३ वर्षी तिचे अपहरण डाकू लाला राम व कुसमा नाइन यांनी केले होते त्यांनतर तिने दरोडेखोर व्हायचे ठरवले. व ती दरोडेखोर झाली. तीची खुंखार दरोडेखोर म्हणून ओळख बनलेली होती. ७० हत्या २०० अपहरण तिच्या नावावर होते. २००० साली तिने सरेंडर केले आणि तिने राजकारणात प्रवेश केला. एका टीव्ही रियल्टी शो मध्ये सुद्धा ती येऊन गेली आहे.

८)मोहर सिंह – पहेलवान असणारा मोहर सिंह हा जमिनीच्या वादातून दरोडेखोर बनला. मोहर सिंह हा खुंखार दरोडेखोर आहे. त्याच्यावर ८० हुन अधिक हत्या केल्याचे आरोप आहेत ५५० हुन अधिक त्याच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. स्वतःच्या पत्नी व मुलीची हत्या सुद्धा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. नंतर पोलिसांच्या स्वाधीन होऊन दरोडेखोरी सोडून सामाजिक कार्य सुरु केले.

९) निर्भय सिंह गुज्जर – चंबळ च्या घाटातील शेवटचा दरोडेखोर म्हणून त्याची ओळख आहे. निर्भय सिंह हा दारू आणि बाई यांचा शौकीन होता त्याने आपल्या टोळीत अनेक महिलांना सामील करून घेतलेले. ४० गावात त्याची दहशत पसरलेली होती त्या गावातील प्रशासन तोच सांभाळायचा. त्याचा २००५ मध्ये पोलिसांनी एन्काउंटर केला.

१०) पुतळी बाई – चंबळच्या घाटातील पहिली महिला दरोडेखोर म्हणून जिची नाव घेतले जाते ती म्हणजे पुतळी बाईचे अत्यंत सुदंर दिसणारी पुतळी बाई हि सुल्तान हा दरोडेखोरासोबत त्याच्या टोळीत राहायची त्याचा मृत्यू झाल्यावर ती टोळीची प्रमुख बनली व तिने अनेक दरोडे टाकले १९५० ते १९५६ पर्यंत तिची प्रचंड दहशत होती. पोलीस चकमकीत तिचा मृत्यू झाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *