भारताचे समजून घाबरलेल्या पाकने पाडले स्वःताचे विमान? वाचा नक्की काय झाले..

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताची चांगलीच दहशत निर्माण झालेली आहे. अनेक प्रकारे भारत पाकिस्तानची कोंडी करत आहे. व्यापार बंदी सोबतच सीमेवर पहारा देखील वाढविण्यात आलेला आहे. भारत आपल्या युद्ध सामुग्रीचा नेहमी सराव करत आहे. यामध्येच एक बातमी आलेली आहे कि भारताचे विमान समजून पाकिस्तान ने पाडले स्वतःचे विमान,

असा प्रकार होऊ शकतो परंतु आम्ही या गोष्टीचा आम्ही शोध घेण्याची सुरवात केली आणि खालील माहिती आम्हाला मिळालेली आहे. सर्वात प्रथम पाकिस्तानी विमान पाकिस्तान ने पाडल्याची बातमी हि मोदीनामा या फेसबुक पेज ने दिली. त्या पेजवर जो पाकिस्तानी विमानाचा फोटो म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे त्याबाबत आम्ही माहिती घेतली असता ते विमान पाकिस्तानी नसल्याचे आढळून आले.

फेसबुकचं नाही तर काही वेब पोर्टल न्यूज पोर्टल यांनी हि पाकिस्तानी विमान पाकिस्तान ने चुकत पाडल्याची बातमी दिली आहे. फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट ने बातमी बाबत चे फॅक्ट चेक केल्यावर पुढील माहिती दिली. सदरील पाकिस्तानी विमान म्हणून जो फोटो टाकला आहे तो बेल्जीयम येथील आहे २०१८ सालच्या विमान अपघाताची घटना आहे. तसेच २१ तारखेला पाकिस्तान बॉर्डर वर दहशतीचे वातावरण होते आणि जेट चे आवाज आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानी न्यूज पेपर नेशन ने असा दावा केला होता कि बॉर्डर वर एक विमान पाकिस्तानी सैन्याने पाडले आहे. पण नंतर चौकशी केल्यानंतर त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. पाकिस्तानी आर्मीने कोणतेही विमान पाडले नाही फक्त सीमेवर तणाव होता मध्ये काही वेळ जेट चा आवाज ऐकायला मिळाला.त्यामुळे आता ज्या काही बातम्या वायरल होत आहेत.त्यात काही एक तथ्य नाही आहे.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *