मुंबईच्या चोर बाजाराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती..

प्रत्येकाला मुंबई बद्दल आकर्षण आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई मध्ये गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल बीचेस इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पण अनेकांना मुंबई मधील वेश्या वस्ती असणाऱ्या ग्रॅण्ट रोड व चोर बाजाराबद्दल आकर्षण आहे. आपण आज मुंबईतील चोर बाजाराबद्दल जाणून घेणार आहोत.

दक्षिण मुंबई मधील मटण स्ट्रीट मोहंमद अली रोडच्या परिसरात चोर बाजार लागतो. या चोर बाजाराला मोठा इतिहास आहे. १५० वर्षांपूर्वी या ठिकाणी विक्रेते मोठा गोंधळ करून वस्तू विकायचे. तेव्हा ब्रिटिश व्हाईसरॉय यांनी या ठिकाणाला शोर बाजार म्हटले आणि त्या ठिकाणचे नामकरण शोर बाजार झाले व त्याचा अपभ्रश होऊन नामकरण चोर बाजार झाले. आता बाजाराचे नावच चोर बाजार आहे त्याठिकाणच्या काही विक्रेत्यांनी ते नाव सार्थ करून दाखवले.

ब्रिटिश साम्राज्याची महाराणी जेव्हा मुंबई मध्ये आली होती तेव्हा तिच्या काही वस्तू एका चोराने चोरी करून त्या वस्तू चोर बाजारात विकायचा प्रयत्न केला होता. शेवटी तो चोर पकडला गेला पण चोर बाजार फेमस झाला. आजच्या काळात वाळकेश्वर येथे राज्यपाल भवन आहे त्या ठिकाणी ब्रिटिश नियुक्त मुंबई चे गव्हर्नर राहत असायचे.

त्या ठिकाणी कडक पहारा आज च्या काळात आहे तसाच तेव्हाही असायचा पण एका चोराने समुद्र मार्गाने जाऊन राजभुवनात चोरी केली आणि सोन्याचे काम केलेला गव्हर्नरचा किमती पोशाख पळवला. चोराने तो पोशाख चोर बाजारात विकायचा प्रयत्न केला पण कोणी घेत नव्हते त्याने पोशाखातील सोन्याचे बटन विक्री केले पण पूर्ण पोशाख कोणी घेतला नाही शेवटी पोलिसांनी चोराला पकडले. तेव्हा पासून या चोर बाजाराच्या कथा सर्व सामान्य माणसात माहिती झाल्या.

चोर बाजारात अँटिक वस्तू हि मिळतात ज्या कधी कधी खूप दुर्मिळ असतात. या ठिकाणी ३०० हुन अधिक अँटिक वस्तू विक्रीचे शॉप आहेत. अँटिक वस्तू घेण्यासाठी परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर या बाजारात येत असतात. याठिकाणी गाड्यांचे पार्टस तर जुन्या गाड्यासुद्धा विक्रीला असतात. याबाजारात कधी कधी पार्किंग केलेल्या गाड्यांचे पार्टस चोरून त्याच बाजारात विक्रीला सुद्धा ठेवले जातात.

त्याबद्दल चा एक किस्सा सांगितल्या जातो गाडीच्या एका चाकाची कव्हर कॅप गळून पडल्याने दुसरी कव्हर कॅप घ्यायला एक व्यक्ती या बाजारात आला त्याने कव्हर कॅप ची मागणी केली. १० मिनिटात देतो म्हटले आणि दुकानदाराच्या साथीदाराने त्याच गाडीची एक कव्हर कॅप चोरून तिच्या मालकाला विकली.अशा प्रकारची टोपी पण घातली जाते.

पण या चोर बाजारात एकदा अवश्य गेले पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी काही अँटिक वस्तू पाहायला मिळतील कधी कधी अँटिक वास्तूच्या नावाखाली या ठिकाणी चायनीज वस्तू सुद्धा विकल्या जातात.पीनपासून मोठमोठी झुंबरे, हवेल्यांच्या खिडक्या दारांपर्यंतच्या वस्तू चोरबाजारात विकायला आणतात. त्यामुळे तेथे रेडिओग्राम, चेंजर, साखळी लावलेली शोभिवंत घड्याळे, जातिवंत लाकडाचे कोरीव नक्षीकाम केलेले फर्निचर, तांबा, पितळ, ब्राँझ, जस्त आदी धातूंपासून बनवलेल्या सुबक वस्तू, पेंटिंग्ज, चित्रे, राजेरजवाड्यात दिसणारे नक्षीकाम केलेले पेटारे, रांजण, गुडगुड्या, पक्ष्यांचे मोठाले पितळी पिंजरे, कलात्मक पुतळे, मूर्ती, चहाचे पेटारे, चौकोनी बरण्या, पोर्सिलीनच्या प्लेट्स, कपबश्या, कटग्लासेस, लायटर्स, अॅश ट्रेज, दारूचे मग्ज, चलनी नाणी यांसारख्या असंख्य गोष्टी विक्रीला येतात.

दर शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून या ठिकाणी दुर्मिळ वस्तू विकायला आणल्या जातात त्या बाजारात आपल्या अनेक दुर्मिळ गोष्टी मिळू शकतात या बाजारासाठी अनेक लोक येतात. आपणास हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा व आमचे पेज शेअर करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *