हाथ जोडून न ऐकणाऱ्यांना ठोकून नीट करणारे मनसेचे ढान्या वाघ नितीन नांदगावकर..

बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सीचालक, गर्दुल्ले यांना मनसे स्टाइल ‘खळ्ळ खट्याक’ हिसका दाखवणारे नितीन नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस बजावल्याने नेटिझन्स आणि मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. विविध स्तरातून या तडीपारीचा निषेध नोंदवण्यात येत आहे. नितीन नांदगावकर हे नेहमीच मराठी माणसाचा मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

मुंबईत कोणालाही कोणतीही अडचण किंवा कोणी काही त्रास देत असेल तर ते मदतीसाठी धावून जातात. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. पण अजूनही त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाहीये. खासरेवर जाणून घेऊया नितीन नांदगावकर नेमके आहेत तरी कोण?

रस्त्यावर खुलेआम नशा करणारे गर्दुल्ले, उर्मट टॅक्सी ड्रायव्हर, पैसे घेऊन नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून बेरोजगारांना फसवणारे ठग यांना वठणीवर आणण्यात ते माहीर आहेत. आजपर्यंत अनेकांना त्यांनी अद्दल घडवली आहे. महत्वाचे म्हणजे मदत करताना ते परप्रांतीय आणि मराठी किंवा जाती धर्माचा भेदभाव करत नाहीत.

सध्या नेटिझन्सनी त्यांच्या समर्थनार्थ #ISuportNitinNandgaonkar हा ट्रेंड सोशल मीडियातून चालवला आहे. मोठी शस्त्रास्त्रे सापडलेल्या भाजप कार्यकर्त्याला क्लीन चिट दिली जाते तर नितीन नांदगावकर यांच्या सारख्या मदत करणाऱ्या सामान्य नेत्याला तडीपारीची नोटीस दिली जाते अशी टीका नेटिझन्स करत आहेत.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

नितीन नांदगावकर हे कुर्ल्याचे रहिवाशी आहेत. सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेले नितीन नांदगावकर हे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत. मनसेच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला मुजोर टॅक्सी चालकांना धडा शिकवला. त्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून त्यांचे काम लोकांपर्यंत पोहचवले आणि अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले.

नितीन नांदगावकर हे प्रत्येकासाठी रात्री अपरात्री उपलब्ध असतात. चुकीला माफी न देणारा हा नेता सर्वाना सहज भेटतो. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर(9768685568) फेसबुकवर दिलेला आहे. त्यावर कोणीही कधीही संपर्क करू शकते. तसेच ते त्यांच्या महाराष्ट्र गड या प्रभादेवीच्या ऑफिसला देखील दर बुधवारी १ ते ६ या वेळेत सर्वांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यातही उपलब्ध असतात.

का करतात ठोकाठोकी?

नितीन नांदगावकर यांना त्यांच्या ठोकाठोकीचे दुःख वाटत नाही. ते म्हणतात माझे व्हिडीओ राज ठाकरे साहेब देखील बघतात आणि त्यांचे कौतुक देखील करतात. नितीन नांदगावकर यांनी आतापर्यंत किती लोकांना ठोकले असेल? एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगू शकत नाही असे उत्तर दिले होते. मागील ३ वर्षांपासून हि ठोकाठोकी करत असून पुढेही करत राहणार असल्याचे ते सांगतात.

नितीन नांदगावकर एखाद्याला ठोकूनच नीट करतात असे नाही तर ते प्रेमाने समजावून पण सांगतात, निवेदने देतात त्यानंतर जर कोणी ऐकत नसेल तर ते आपल्या पद्धतीने ठोकतात.

त्यांच्या मते ठोकशाही हि त्यांच्यात लहानपणीपासूनच होती. जिथे चुकीचे काही होताना दिसते तिथे ते तिचा अवलंब करायचे. त्यांच्या आयुष्यात ते तीन व्यक्तींना सर्वस्व मानतात. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे आणि राज ठाकरे.

मराठी माणसांसाठी लढणाऱ्या या वाघाला खासरेच्या शुभेच्छा.माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *