केएफसी चे संस्थापक कर्नल हारलैंड सांडर्स यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास..

आज आम्ही आपल्यासाठी एक प्रेरणादायी स्टोरी घेऊन आलो आहोत जी वाचून आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे नाकार्थी विचार राहणार नाहीत. व्यवसाय करायला विशिष्ट वय लागत नसते हे पण यातून आपल्या लक्षात येईल. आपण नॉनव्हेज प्रेमी असाल तर आपल्या डोळ्यासमोर KFC चिकन आले असेल. केएफसी चिकन चे रेस्टारंट आपण कुठे ना कुठे पाहिले असेल आपल्यापैकी काहीजणांनी त्याठिकाणी जाऊन KFC चिकन खाल्ले सुद्धा असेल.

आज आपण पाहणार आहोत केएफसी चिकन ज्या व्यक्तीने लाँच केले त्या केएफसी चे संस्थापक कर्नल हारलैंड सांडर्स यांच्या बद्दल. त्यांचा जन्म अमेरिकेत ९ सप्टेंबर १८९० साली झाला त्यांची आई मारग्रेट डनलेवी आणि वडील विल्बर डेविड सांडर्स होते वयाच्या ५ व्यावर्षी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर आई ला जॉब ला जावे लागायचे तेव्हा हारलैंड हे घरी एकटे असायचे तर नाईलाजाने त्यांना जेवण बनवायचे शिकावे लागले. त्यांचे ७ वि पर्यंत शिक्षण झाले वयाच्या १२ व्या वर्षी त्यांच्या आईने दुसरे लग्न केले तेव्हा आईचे घर सोडून निघून ते गेले त्यांचा मोठा संघर्ष सुरु झाला.

त्यांनी त्या वयात त्याकाळातील वाफेवर चालणाऱ्या जहाजावर काही वर्ष नोकरी केली नंतर त्यांनी इन्शुरन्स सेल्समन ची नोकरी केली काही वर्षांनी रेलरोड वर फायरमन चा जॉब केला वयाच्या ४० नंतर त्यांनी एका सर्व्हीस सेंटर मध्ये चिकन बनवायची नोकरी केली. त्यांच्या टेस्टी चिकन ची वाह वाह व्हायला लागली होती.पण त्यांनी चिकन बनवण्यासाठी काही प्रयोग करून पहिले लवकर चिकन बनवण्याचा त्यांचा फॉर्मुला त्यांनी लाँच केला पण ते चिकन लोकांना आवडले नाही. नंतर असेच नवनवीन प्रयोग करत राहिले.

त्यांनी चिकन फ्राईड चा एक फॉर्मुला तयार केला आणि त्याद्वारे चिकन बनवून अनेक हॉटेल मालकांना खाऊ घातले. आपण २ ते ४ लोकांनी नकार दिला तर आपली वस्तू चुकीची झाले समजून गप्प बसतो. पण हारलैंड सांडर्स हे शांत बसले नाहीत. त्यांनी खूप वेळा हॉटेल मालकांना चिकन ची टेस्ट करायला लावली पण त्यांनी सर्वानी नकार दिला. खूप वेळा नकार येऊन नंतर एका हॉटेल मालकाला त्यांचे ते चिकन आवडले व त्यांनी आपल्या रेस्टारंट मेनू मध्ये त्यांच्या चिकन चा समावेश केला.

त्या हॉटेल मधील ग्राहकांना हारलैंड सांडर्स यांचे चिकन आवडले नंतर त्यांच्या चिकनच्या रेसिपीला अनेक ठिकाणाहून मागणी येऊ लागली. त्यानंतर इतर हॉटेल मध्ये हि त्यांचे चिकन विक्री होत होते. १९३५ साली त्यांचा गव्हर्नर ने सत्कार करून त्यांना Kentucky Colonel हि उपाधी दिली. त्यांनी १९३९ साली आपले रेस्टारंट सुरु केले काही वर्षांनी बंद केले.

१९५० साली त्यांनी केएफसी ब्रँड लाँच केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला वयाच्या ६१ व्य वर्षी त्यांना व्यवसायात यश मिळाले आणि त्यांनी आपला व्यवसाय पूर्ण जगभर पसरवला. आज ११८ देशात १९ हजाराहून अधिक शाखा असणारा केएफसी चा जगातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून परिचित आहे. मॅकडोनाल्ड नंतर दोन नंबरला या ब्रँड च्या शाखा आहेत.

हारलैंड सांडर्स यांनी केएफसी ला २ मिलियन डॉलर मध्ये १९६४ साली विकले व स्वतःकडे केएफसी चे प्रवक्तेपद घेतले. १९७६ साली जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते झळकले होते १९८० मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.पण आज हि केएफसी ब्रँड च्या माध्यमातून जगभरात आपली अनुभूती देत आहेत. त्यांच्या जीवन प्रवासावरून आपण हि प्रेरणा घेऊन जीवनात प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावा.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेलवर मेल करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *