सिंह, काळवीट आणि कोल्हा : एक रशियन दंतकथा

एका दरीच्या कड्यावरून एक सिंह एका काळविटाचा पाठलाग करीत होता. जवळपास त्याला पकडलेच आणि अधाशीपणे तो एका निश्चित व भरपेट जेवणाची अपेक्षा करत होता. बळीच्या बिचाऱ्या काळविटाला निसटून जाणे जवळपास अशक्य होते . कारण शिकार व शिकाऱ्याला मज्जाव करणारी एक फार खोल घळी समोर होती. पण तल्लख चपळ काळविटाने स्वतःची सगळी ताकद एकवटली धनुष्यातून सुटलेला बाणाप्रमाणे थेट झेप घेतली घळी पार केली आणि दुसर्‍या बाजूच्या उंच दगडी सुळक्यावर निश्चल उभा राहिला.

सिंह मात्र तिथे जागीच थबकला पण नेमक्या त्याच क्षणाला त्याचा एक मित्र जवळपास होता. तो मित्र एक कोल्हा होता. काय..! काय तो म्हणाला तुझी जबरी ताकद आणि चपळता पाहता एका दुबळ्या काळविटाच्या समोर तू नमते घेणे शरण जाणे ही शक्य कोटीतील गोष्ट आहे का? तुला फक्त संकल्प केला पाहिजे. जबर इच्छा धरलीस ना तर चमत्कार करशील.

हे घळीचे विवर खोल असेलही पण तू जर खरोखरीचा प्रामाणिक प्रयत्न करशील तर हे विवर तू सहजी पार करशील याची मला खात्री आहे खरोखरच तू माझ्या निस्वार्थी माहिती वर भरवसा ठेव. तुझी प्रचंड ताकद ताकद यावर जर माझा इतका अतूट विश्वास नसताना तर मी कधीकधी तुझा मोलाचा जीव धोक्यात घालायला धजलो नसतो.

सिंहाचे रक्त ताप ताप तापले त्याच्या नसानसात रक्‍त उसळून लागले त्याने स्वतःच्या संपूर्ण ताकदीनिशी आसमंतात लांब झेप घेतली परंतु तो घळी चे अंतर पार करू शकला नाही. कडेलोट होऊन तो शेवटी खाली गडगडला. दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्या जिवलग मित्राने काय केले? अत्यंत सावधपणे मार्ग काढत काढत तो घळीच्या तळाशी पोहोचला आणि तिथे उघड्या जागी मस्त मोकळ्या हवेमध्ये पोहोचल्यावर त्याला हे दिसले की सिंहाला प्रशंसा नको.

तसेच त्याची आज्ञापालन करायचीही काही गरज उरली नाही आपल्या जीवलग मित्राच्या बाबतीतला दुखद विधी पार पाडण्यास त्याने सुरुवात केली. नंतर महिन्याभरातच कोल्ह्याने सिंहाची सिंहाची हाडे स्वच्छ केली.

ही रशियन दंतकथा आहे. कोल्ह्या पासून सावध राहावे. आपल्या कडील माहिती आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता. माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *