राज्य सरकारचा शहीद जवानांच्या मदतीचा बनाव रोहित पवारांमुळे उघड

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले त्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील २ जवान सुद्धा शहीद झाले. त्या जवानांना राज्य सरकार ने ५० लाखाची मदत जाहीर केली. हि मदत तात्काळ द्यायची असते. पण प्रशासनाने अंत्यसंस्काराच्या वेळी शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना ५० लाख मदतीचा चेक दिला आणि फोटो काढून घेतले. फोटो काढल्यानंतर त्यांच्याकडून चेक वापस घेतला.

हा संतापजनक प्रकार १८ फेब्रु ला रोहित पवार हे शहीद जवान नितीन राठोड यांच्या घरी आल्यानंतर उघड झाला. नितीन राठोड यांच्या बंधूने शासनाने फोटो काढण्यापर्यंत चेक दिल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सुद्धा अजून पर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना भेट नाही दिली हे सुद्धा उघड झाले. पालकमंत्री हे नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेत व्यस्त होते.त्यामुळे त्यांना शहिदांच्या कुटुंबियांना भेटावे सुद्धा वाटले नाही.

बारामती हुन रोहित पवार येऊन शहीदांच्या कुटुंबियांना भेटतात व आर्थिक मदत करतात हे जेव्हा जिल्हाभर पसरले तेव्हा प्रशासनाने तातडीने आपल्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी १९ फेब्रु शिवजयंती ची सुट्टी असताना हि नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना वटणारा चेक बनवून द्यावा लागला. या प्रकारामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना हि सरकार कशा प्रकार फसवते उघड झाले.

रोहित पवार यांच्या भेटीनंतर सरकारला जाग आली त्यांनी महसूल राज्य मंत्री संजय राठोड यांना नितीन राठोड यांच्या कुटुंबियांच्या भेटीला पाठवले. पालकमंत्री येरावार हे जवानाच्या अंत्यसंस्काराला येण्याचे सोडून प्रधानमंत्री मोदींची सरबराई करण्यात व्यस्त राहिले. त्यांच्यावर राज्यभर टीका झाल्यानंतर काल त्यांनी जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबियांना भेटी दिल्या.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *